पंढरपूर देवदर्शना साठी जाणाऱ्या अल्पवयीन मुलीवर कोयत्याचा धाक दाखवून अत्याचार
दौंड तालुक्यातील स्वामी चिंचोली येथील घटना
दौंड प्रतिनिधी=समीर सय्यद
कुरकुंभ: पुणे सोलापूर राष्ट्रीय महामार्गावरून पंढरपूर देवदर्शनासाठी निघालेल्या आणि चहा पिण्यासाठी थांबलेल्या कुटुंबातील एका अल्पवयीन मुलीला दुचाकीवरून आलेल्या दोघा अज्ञात व्यक्तींनी गळ्याला कोयता लावून फरफटत नेऊन अल्पवयीन मुलीवर अत्याचार करून तिच्या गळ्यातील दागिने लुटून पसार झाले. असल्याची माहिती पोलिसांनी दिली. दरम्यान, या घटनेने तालुक्यातील कायदा सुव्यवस्थेचा आणि महिलांच्या सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. पुणे सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर दौंड तालुक्यातील स्वामी चिंचोली हद्दीत हा प्रकार घडल्याचा समोर आले आहे.
याबाबतची प्राथमिक माहिती बारामती विभागाचे अतिरिक्त पोलीस अधीक्षक गणेश बिराजदार यांनी पत्रकारांशी बोलताना याबाबत अधिक माहिती दिली. पुणे सोलापूर राष्ट्रीय महामार्गावरून चारचाकी वाहनातून पंढरपूर येथे देवदर्शनसाठी जात असताना सोमवारी (दि.३०) पहाटे साडेचार वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. दौंड पोलीस ठाण्याच्या
हद्दीतील स्वामी चिंचोली येथे महामार्गलगत एका हॉटेलमध्ये चारचाकी वाहनातून आलेले महिला व पुरुष हे या ठिकाणी चहा पिण्यासाठी थांबले होते.
या घटनेने दौंड तालुक्यासह जिल्ह्यात मोठी खळबळ उडाली आहे. या प्रकरणी दौंड पोलीस ठाण्यात पोक्सो कायद्यासह दरोड्याचा व शस्त्र अधिनियम कलमांतर्गत गुन्हा दाखल झाला असून पोलीस अज्ञात संशयित आरोपींचा शोध घेत आहेत. दरम्यान, घटनास्थळी बारामती विभागाचे अतिरिक्त पोलीस अधीक्षक गणेश बिरादार, दौंड उपविभागीय पोलीस अधिकारी बापूराव दडस, पोलीस निरीक्षक गोपाळ पवार यांनी भेट देऊन परिसराची पाहणी केली. असून पोलीस पुढील तपास करत आहे.


कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा