मा आ.बबनराव शिंदे यांना दीर्घायुष्य लाभो यासाठी चव्हाणवाडी ग्रामस्थांच्या वतीने ग्रामदैवतास जलधारा अभिषेक.
टेंभुर्णी प्रतिनिधी.
माढा तालुक्याचे मा.आ. बबनदादा शिंदे यांना दीर्घायुष्य लाभावे याकरिता चव्हाणवाडी ग्रामस्थांनी आज सोमवार दिनांक 23/ 6/2025 सकाळी साडेसात वाजता मारुती मंदिरामध्ये जलधारा अभिषेक करण्यात आला.
माजी आमदार बबनदादा शिंदे हे सध्या उपचारासाठी अमेरिकेमध्ये गेलेले आहेत तेथे त्यांच्यावर मोठी शस्त्रक्रिया होणार असल्याने त्यांच्यावर होणारी शस्त्रक्रिया यशस्वी होण्यासाठी माढा तालुक्यातील गावोगावी त्यांच्यासाठी प्रार्थना केली जात आहे. व जलधारा अभिषेक ही करण्यात येत आहे. त्यांना दीर्घायुष्य लाभावे व जनतेमध्ये पुन्हा सक्रिय होऊन माढा तालुक्यातील गोरगरीब जनतेची कामे त्यांच्या हातून पुन्हा व्हावी यासाठी चव्हाणवाडी तालुका माढा येथील
विठ्ठलराव शिंदे कारखान्याचे संचालक अशोक मिस्कीन व चव्हाणवाडी सोसायटीचे मा. चेअरमन नरहरी नांगरे यांच्या हस्ते जलधाराभिषेक सर्व गावकरी व ग्रामस्थांच्या उपस्थितीत करण्यात आला. यावेळी गावातील सर्व नेतेमंडळी व ग्रामस्थांनी मारुती मंदिरामध्ये त्यांच्यावर होणारी शस्त्रक्रिया ही यशस्वी होवो यासाठी प्रार्थना केली.
यावेळी चव्हाणवाडी गावातील सर्व ग्रामस्थ मारुती मंदिरामध्ये मोठ्या संख्येने उपस्थित होते.


कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा