बहुजन मराठी पत्रकार संघाच्या वतीने गुणवंत विद्यार्थी व उत्कृष्ट कार्य करणाऱ्या अंगणवाडी मदतनिसांचा येत्या 27 जून रोजी होणार सन्मान.....श्रीमती प्रमिला जाधव
करमाळा प्रतिनिधी
बहुजन मराठी पत्रकार संघाच्या करमाळा शाखेच्या वतीने येत्या शुक्रवारी दिनांक 27 जून 2025 रोजी गुणवंत विद्यार्थी व उत्कृष्ट कार्य करणाऱ्या अंगणवाडी मदतनिसांचा सन्मान सोहळ्याचा कार्यक्रम करमाळा येथील पंचायत समितीच्या सभागृहामध्ये सकाळी साडेअकरा वाजता संपन्न होणार असल्याची माहिती बहुजन मराठी पत्रकार संघाच्या जिल्हा महिला उपाध्यक्ष श्रीमती प्रमिला जाधव यांनी माहिती दिली
प्रति वर्षाप्रमाणे याही वर्षी बहुजन मराठी पत्रकार संघ महाराष्ट्र राज्य शाखा करमाळा यांच्या वतीने सदर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे सदर सन्मान सोहळ्याचे चौथे वर्ष असून यावर्षी देखील बहुजन मराठी पत्रकार संघाने सदरचा आगळा वेगळा उपक्रम राबविला आहे सदर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी करमाळा पंचायत समितीचे गटविकास अधिकारी डॉक्टर अमित कदम तसेच धाराशिव जिल्हा परिषदेचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी श्री मनोज राऊत हे राहणार असून प्रमुख उपस्थिती म्हणून यशकल्याणी सेवाभावी संस्थेचे अध्यक्ष गणेश करे पाटील, तसेच पोलीस निरीक्षक श्री रणजीत माने, डॉक्टर निलेश मोटे, एडवोकेट बाबुराव हिरडे, किरण सूर्यवंशी, आतकर मॅडम, भारती परचंडराव मॅडम तसेच अंकुश शिंदे विलास नाईकनवरे आदी प्रमुख पाहुणे उपस्थित राहणार असल्याची माहिती श्रीमती जाधव यांनी दिली
सदरचा कार्यक्रम यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी सोलापूर जिल्हा बहुजन मराठी पत्रकार संघाच्या महिला जिल्हाध्यक्ष सौ आशाताई चांदणे, जिल्हा उपाध्यक्ष बाळासाहेब भिसे, जिल्हा सचिव आबासाहेब झिंजाडे, तालुका उपाध्यक्ष दादासाहेब शिंदे, जिल्हा महिला उपाध्यक्ष श्रीमती प्रमिला जाधव, करमाळा तालुका अध्यक्ष प्रमोद खराडे, तालुका कार्याध्यक्ष संभाजी शिंदे, तसेच सदस्य संजय चांदणे, सचिन नवले श्रीमंत दिवटे सौ माधुरी ताई कुंभार सौ हिराबाई देमुंडे तसेच सौ सुवर्णा निंबाळकर आधी बहुजन मराठी संघातील पदाधिकारी हे विशेष परिश्रम घेत आहे
सदरच्या कार्यक्रमाला पालक तसेच विद्यार्थी याशिवाय करमाळा तालुक्यातील अंगणवाडी मदतनिसांनी जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवावी असे शेवटी आवाहन श्रीमती प्रमिला जाधव यांनी केले आहे


कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा