पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांच्या जयंतीनिमित्त करमाळा येथे तीन दिवस विविध सामाजिक कार्यक्रमाचे आयोजन
करमाळा प्रतिनिधी
करमाळा शहरात पुण्यश्लोक राजमाता अहिल्याबाई होळकर यांच्या ३०० व्या त्रिशताब्दी जयंती निमित्ताने करमाळा येथे तीन दिवसीय सामाजिक आणि मिरवणूकीचे आयोजन करण्यात आलेले आहे. ३०० व्या जयंतीच्या अनुषंगाने दिनांक ३१ में,वार शनिवार रोजी सकाळी ९:०० वाजता प्रतिमा पूजन व नामफलकाचे अनावरण अहिल्यानगर तुळशीवृंदावन देवीचा रोड येथे
उपस्थितीत मान्यवरांच्या हस्ते करण्यात येणार आहे. तर जिल्हाभरातून चौंडी येथे जाणाऱ्या अनुयायी अहिल्या प्रेमींना साठी सकाळी ११:०० वाजता नाष्टा व थंड पाण्याचे आयोजन के,हाईट्स बायपास रोड करमाळा येथे केलेले आहे.
..
दूसऱ्या दिवशी
दिनांक १ जून वार- रविवार, रोजी सकाळी- १०:००वाजता वृक्षारोपण कृष्णाजीनगर अहिल्यादेवी होळकर प्लाॅट येथे करण्यात येणार तर सकाळी ११:०० वाजता कुटीर रुग्णालय येथे निवासी रूग्णांना फळे वाटप करण्यात येणार आहे. तर दूपारी २:०० वाजता पांजरपोळ गो-शाळा कोर्ट जवळ मुक्या जनावरांना ओला चारा वाटप करण्यात येणार आहे. तर सायंकाळी ५:००वाजता पांडे रोड येथील मातोश्री वृद्धाश्रम येथे अनाथ वृध्दांना अल्प-उपहार करण्यात येणार आहे.
तिसऱ्या दिवशी दिनांक २ जून, वार-सोमवार रोजी दूपारी-३:००वाजता, देवीचा-रोड तुळशीवृंदावन, अहिल्यानगर येथून लोकमाता पुण्यश्लोक महाराणी अहिल्याबाई होळकर यांची भव्य दिव्य मिरवणूक काढण्यात येणार आहे. या मिरवणूकीत प्रामुख्याने शोभा वाढवण्यासाठी राजमाता यांच्या प्रतिमेचा भव्य रथ , बॉन्ड पथक, डीजे,घोडे, लेझीम पथक आणि पारंपरिक आसलेली गजी-ढोल नृत्यांसह बेल-भंडारांसह फटाक्यांच्या आतिषबाजीने शहरातील मुख्य रस्त्याने मिरवणूकीस प्रारंभ होणार आहे. मिरवणूक समाप्ती नंतर सेंन्ह भोजनाचे आयोजन देखील कार्यक्रम स्थळी केले आसल्याची माहीती सकल धनगर समाज करमाळा तालुक्याच्या वतीने देण्यात आली आहे. तालुक्यात होऊ घातलेल्या तीन दिवसीय जयंतीला समाज बांधवांनी जास्तीत जास्त संख्येने उपस्थितीत राहाण्याचे आव्हान जयंती उत्सव समितीच्या वतीने करण्यात आले आहे..


कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा