*मोडनिंबचे ग्रामदैवत श्री वेताळबाबा यात्रेस शनिवार पासून प्रारंभ*
मोडनिंब (प्रतिनिधी) मोडनिंब चे ग्रामदैवत श्री वेताळ बाबा यात्रेस शनिवारी ,१० मे पासून सुरुवात होत आहे . शनिवारी दहा में रोजी सायंकाळी हभप सागर महाराज बोराटे यांचे किर्तन होणार आहे.रविवारी आकरा में रोजी नरसिंह जयंती निमित्त महाभिषेक सायंकाळी चार वाजता वाजत गाजत तोरणमाळा देवस्थान कडे नेण्यात येणार आहेत. सायंकाळी सात वाजता देव आणण्याचा कार्यक्रम होणार आहे . याच दिवशी रात्री समाज प्रबोधनकार हभप शिवलिला पाटील यांचे किर्तन होणार आहे. तर सोमवारी १२ मे रोजी सकाळी वेताळबाबांंना महाअभिषेक होईल. सायंकाळी देवाचा छबिना निघेल.यानंतर पावसची परिस्थिती व पिकपाणी याविषयीची भाकणूक होईल. तसेच पारंपरिक सोंगाच्या गाड्या निघून , शोभेचे दारूकाम होणार आहे. . मंगळवार १३ मे रोजी सकाळी आठ वाजता पालखीची भव्य मिरवणूक मोडनिंब गावातून निघणार आहे. सकाळी नऊ वाजता भेदी गाणी व कलगीतुरा वादनाच्या स्पर्धा होतील. संध्याकाळी डिजिटल सोगाच्या गाड्या व माहेराला ये ग माझ्या वहिनी हे मराठी नाटक होणार आहे. बुधवारी १४मे रोजी पाच वाजता जंगी कुस्त्यांचे मैदान वेताळ बाबाच्या मंदिराजवळीळ आखाड्यात होईल .
संध्याकाळी आधुनिक सोगाच्या गाड्या व बारा गावच्या बारा अप्सरा हे मराठी नाटक होणार आहे. गुरुवारी १५ में यात्रेचा शेवटचा दिवस असून त्या दिवशी धुमाकूळ बारामती कार्यक्रम होणार आहे.आलेल्या भक्त मंडळी साठी यात्राकाळात राजवाडा हाॅलमध्ये दररोज जेवणाची सोय केली आहे.
यात्रा उत्सवाच्या काळात भाविकांनी शांतता, स्वच्छता,व शिस्त बाळगून यात्रेचा आनंद द्विगुणित होईल या दृष्टिकोनातून सहकार्य करावे, तसेच
या यात्रोत्सवासाठी मोडनिंब परिसरातील श्री वेताळबाबा भक्तांनी यात्रा उत्सवात मोठ्या संख्येनेसहभागी होण्याचे आवाहन वेताळ देवस्थान ट्रस्टच्या वतीने करण्यात आले आहे .


कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा