Breaking

शुक्रवार, २५ एप्रिल, २०२५

निष्पाप लोकांचा बळी घेणाऱ्या दहशतवाद्यांना गोळ्या घातल्या पाहिजे हीच खरी श्रद्धांजली - सकल मुस्लीम समाज करमाळा*



*निष्पाप लोकांचा बळी घेणाऱ्या दहशतवाद्यांना गोळ्या घातल्या पाहिजे हीच खरी श्रद्धांजली - सकल मुस्लीम समाज करमाळा 

जेऊर प्रतिनिधी
*आज दिनांक 25/04/2025 रोजी करमाळा शहरातील आणि तालुक्यातील ग्रामीण भागातील मशिदीत शुक्रवारच्या  नमाजपठण सर्व मुस्लीम बांधवांनी दंडाला काळ्या पट्ट्या बांधून नमाज पुर्ण केली आहे घडलेल्या घटनेबद्दल निषेध म्हणून आणि या घटनेत मृत्यू झालेल्या निष्पाप नागरिकांबद्धल दुवा करून श्रद्धांजली अर्पण करण्यात आली*
*काश्मीरमधील पहलगाम भागात पर्यटकांवर झालेल्या भ्याड दहशतवादी हल्ल्याचा आम्ही संपूर्ण समाज तीव्र शब्दांत निषेध करतो. या दुर्दैवी घटनेत काही निष्पाप पर्यटकांचा मृत्यू तर, काही जण गंभीर जखमी झाल्याचं वृत्त अतिशय धक्कादायक आणि मन हेलावून टाकणारं आहे. ही मानवजातीची हत्या झाली आहे या दुर्घटनेत मृत्यू पावलेल्यांना आम्ही सर्व समाजातील लोक भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. त्यांच्या कुटुंबियांप्रती सहसंवेदना व्यक्त करतो. जखमींच्या प्रकृतीत लवकरात लवकर सुधारणा होवो, हीच ईश्वरचरणी प्रार्थना करतो.*
           *हा भ्याड हल्ला करणाऱ्या दहशतवादी संघटना व त्यांच्या इतर संघटनांवर बंदी घालण्यात यावी व दोंषी दहशतवादी यांना फाशीची शिक्षा किंवा जागेवर कंठस्नान देण्यात यावे अशी मागणी भारतरत्न डॉ ए पी जे अब्दुल कलाम फाऊंडेशन करमाळा व सकल मुस्लीम समाज करमाळा यांच्या वतीने भारत सरकार यांच्या कडे करत आहेत.*
यावेळी जमियत उलमा हिद चे मौलाना मोहसीन , आयशा मस्जिद चे अबु रेहान , मक्का मस्जिद चे मौलाना सिकंदर, जामा मस्जिद चे मौलाना अनवर, आयशा मस्जिद चे मौलाना सय्यद अली, सुलेमानी मस्जिद चे मौलाना मोहम्मद फारुख रझा , सकल मुस्लीम समाज चे जमीर सय्यद , रमजान बेग सुरज शेख इकबाल, शेख मजहर .समीर बागवान नालबंद,आल्लाऊदिन शेख .मुस्तकीम पठाण , इम्तियाज पठाण अरबाज बेग शाहीद बेग कलीम शेख ,फिरोज बेग, कलंदर शेख, आलीम शेख, नजम शेख, अनवर शेख,अकीब सय्यद.
हाजी ईम्रान.आजीम,शेख.अस्लम बेग.कबीर भाऊ साहेब . सद्दाम कुरेशी.अफजल शेख.जाकीर वस्ताद अरबाज घोडके .जाकीर पठाण अशरफ तांबोली .हाफ़िज़ अब्दुला सरफराज पठाण.सरफराज सय्यद.सुहेल मुलाणी. इसराइल राज. आमन शेख.अमीर वस्ताद...

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा