*छत्तीस गावातील सहकार्या मुळे मला आमदार म्हणून काम करायची संधी मिळाली... संजय मामा शिंदे*
*आमदार संजय मामा शिंदे यांचा तांदुळवाडी तालुका माढा येथील गावभेट दौरा..*
कन्हेरगाव/प्रतिनिधी
सोमवार दिनांक २१ ऑक्टोबर रोजी सकाळी ९ वाजता मोठ्या उत्साहात संपन्न झाला . यावेळी सरपंच रणजितसिंह पाटील , उपसरपंच किरण गवळी , जिल्हा परिषद सदस्य अण्णासाहेब उबाळे , कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक सुरेश बागल , हर्षल बागल , संचालक धनंजय मोरे , म्हैसगाव चे युवा नेते लक्ष्मण पाटील , शेतकरी संघटनेचे नेते नामदेव नाना भोसले , दशरथ नाना गवळी , सर्जेराव बागल , माजी सरपंच प्रमोद भोसले , ग्रामपंचायत सदस्य जानराव गुरुजी , मारुती भोसले , जयसिंग भोसले , अमोल उबाळे, सोसायटीचे चेअरमन अतुल गवळी, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे उपाध्यक्ष गणेश परबत , दत्तात्रय कदम , अभिजित गवळी , गुलाब जाधव , सुमंत गवळी यांच्यासह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते..
यावेळी आमदार संजयमामा शिंदे म्हणाले की , छत्तीस गावातील लोकांनी गेल्या वेळेस अतिशय चांगले सहकार्य केल्यामुळे मला आमदार म्हणून काम करायची संधी मिळाली जेवढा कार्यकाळ मिळाला तेवढा प्रामाणिकपणे काम केले याचा मला अभिमान आहे . मी आतापर्यंत मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेतून , 25 15 योजनेतून , बजेट मधून , HAM योजनाअंतर्गत अशा वेगवेगळ्या माध्यमातून या भागातील रस्त्यांची कामे करण्यासाठी निधी दिला आहे म्हैसगाव तांदुळवाडी रस्ता पूर्ण करणारा असून उर्वरित राहिलेल्या कामांना सुद्धा न्याय देण्याचा प्रयत्न करणार असल्याचे आमदार संजय मामा शिंदे यांनी तांदुळवाडी ग्रामस्थांना अभिवचन दिले .


कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा