*तहसील विभाजनाचा म्हणजेच अप्पर अनगर तहसील प्रश्न न्यायालय निर्णयाच्या अधीन राहील - उच्च न्यायालय मुंबई*
मोहोळ/ प्रतिनिधी
दिनांक २४ जुलै २०२४ रोजीच्या GR अनुषंगाने विरोधात दाखल झालेल्या मोहोळ बार असोसिएशन व मोहोळ तालुका बचाव संघर्ष समितीच्या याचिकांच्या सुनावणीमध्ये माननीय उच्च न्यायालयाने (खंडपीठ - न्यायमूर्ती मा.श्री.चांदुरकर व न्यायमूर्ती मा.श्री.पाटील ) शासनाने घेतलेल्या सर्व स्टेप्स न्यायालयाच्या अंतिम निर्णयाशी अधीन राहतील असे आदेश दिले आहेत .
अप्पर अनगर तहसीलच्या समर्थनातील दरम्यानच्या प्रकरणातील ( IA ) ३ अर्ज न्यायालयाने आज मंजूर केले नाहीत म्हणजे प्रलंबित न्यायप्रविष्ठ ठेवले आहेत .पुढील तारीख २६ सप्टेंबर २०२४ आहे
वरील प्रकरणात याचिकाकर्ते तर्फे मा.श्री. सुरेल शहा वरिष्ठ वकील व मा.श्री.अनंत वडगावकर तसेच मा.श्री. ऋषिकेश शिंदे यांनी काम पाहिले
यावेळी न्यायालयात त्यांच्याबरोबर मा. श्री.सोमेश क्षीरसागर मोहोळ न्यायालयातील विधीज्ञ मा.श्री. मा.श्री.हेमंत शिंदे मा.श्री. हिंदुराव देशमुख मा.श्री.महेश कुलकर्णी मा.श्री.संतोष कुलकर्णी मा.श्री.धावणे उपस्थित होते


कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा