करमाळा नगरपरिषदेने अपंगांचा राखीव असलेला निधी तात्काळ वितरीत करावा – प्रियांका गायकवाड
करमाळा प्रतिनिधी :- करमाळा नगरपरिषदेने अपंगांचा राखीव निधी तात्काळ वितरीत करावा याकरिता शिवसेनेच्या महिला तालुका प्रमुख प्रियांका गायकवाड, उप तालुका प्रमुख शामल रंदवे, शिवसेना शहर प्रमुख नागेश काळे, महिला शहर प्रमुख गिता हेंद्रे यांनी मुख्याधिकारी करमाळा नगरपरिषद यांना निवेदन दिले आहे.
यावेळी गायकवाड यांनी सांगितले की, महाराष्ट्र राज्याचे संवेदनशील मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे अपंगाच्या कल्याणाकरिता विविध योजना राबवित आहेत. अपंगांचा सर्वांगीण विकास व्हावा त्यांना त्यांचे हक्क मिळावेत याकरिता शासनस्तरावर निर्णय घेतले जात आहेत. त्यास अनुसरून करमाळा नगरपालिकेने सुध्दा अपंगाचे हक्काच्या बाबी त्यांना देणे गरजेचे आहे. परंतु करमाळा नगरपरिषदेकडून अपंगाचा राखीव निधी त्यांना वितरीत करण्यात आलेला नाही. शासन आदेशानुसार नगरपरिषदेने प्रत्येक वर्षी अपंगांकरिता राखीव ठेवलेला त्यांना वितरीत करणे बंधनकारक आहे. परंतु त्यांना अदा केलेला नाही.
यावेळी गायकवाड यांनी मुख्याधिकारी यांना आपण स्वत: लक्ष घालून अपंगांचा हक्काचा असलेला निधी त्यांना तात्काळ वितरीत करणेबाबत संबंधितांना आदेशित करावे अशी विनंती केली. तसेच यापुढे प्रत्येक वर्षी त्यांना निधी वितरीत करणेसाठी योग्य ती उपाययोजना राबवावी अशी आग्रही मागणी यावेळी गायकवाड यांनी केली.
यावेळी शाखा प्रमुख मनिषा कारंडे, सुवर्णा सुरवसे, राजश्री शिंदे, भक्ती गायकवाड आदी पदाधिकारी उपस्थित होते.


कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा