Breaking

सोमवार, ५ फेब्रुवारी, २०२४

अनुदानासह 2750 प्रमाणे 68 कोटी ऊस बिल शेतक-यांच्या खात्यात जमा-दहा दिवसाला ऊस बिले देणेच्या परंपरा कायम31 जानेवारी अखेर ऊस बिल देणारा एकमेव कारखाना....... आ.बबनराव शिंदेबेंबळे।प्रतिनीधी।


अनुदानासह 2750 प्रमाणे 68 कोटी ऊस बिल शेतक-यांच्या खात्यात जमा-

दहा दिवसाला ऊस बिले देणेच्या परंपरा कायम

31 जानेवारी अखेर ऊस बिल देणारा एकमेव कारखाना
....... आ.बबनराव शिंदे

बेंबळे।प्रतिनीधी।  AJ 24Taas News Maharashtra साठी मुकुंद रामदासी  बेंबळे 
      
विठ्ठलराव शिंदे सहकारी साखर कारखान्याचे युनिट नं.1 पिंपळनेर व युनिट नं.2 करकंब कारखान्याकडे 16 ते 31 जानेवारी दरम्यान गळीतास आलेल्या ऊसाचे अनुदानासह प्रति टन रू.2750/-प्रमाणे ऊस बिल शेतक-यांच्या खात्यावर जमा करण्यात आले असून 15 जानेवारी ऊस तोडणी वाहतूक बिले वाहनमालकांच्या खात्यावर जमा करणेत आले असल्याची माहीती संस्थापक अध्यक्ष आ.बबनराव शिंदे यांनी दिली.
अधिक माहीती देताना आ.शिंदे म्हणाले की,  विठ्ठलराव शिंदे सहकारी साखर कारखान्याचे युनिट नं.1 पिंपळनेर व युनिट नं.2 करकंब येथील सन 2023-24 चा गाळप हंगाम सुरू असून युनिट नं.1 येथे आजअखेर 11 लाख 83 हजार 087 मे.टन व युनिट नं.2 येथे आजअखेर 4 लाख 10 हजार 016 मे.टन ऊस गाळप झाले आहे. दोन्ही युनिटचे मिळून आजअखेर 15 लाख 93  हजार 103  मे.टन ऊसाचे  गाळप झालेले आहे. या हंगामामध्ये दोन्ही युनिटकडे कडे 16 ते 31 जानेवारी 2024 या कालावधीत गाळपास आलेल्या सर्व ऊसास जाहीर केलेप्रमाणे प्रति टन रू.50/- अनुदानासह प्रति टन रू.2750/-प्रमाणे ऊस बिल शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा करण्यात आला आहे. त्यापोटी  कारखान्याने 68 कोटी 21 लाख बँकेत जमा केले आहेत.
तसेच दोन्ही युनिट कडे ऊस तोडणी वाहतूकीसाठी असलेल्या वाहनचालकांची 15 जानेवारी अखेरपर्यंतची तोडणी वाहतूक बिले अदा करण्यात आली आहेत. 1 ते 15 जानेवारी या कालावधीचे तोडणी वाहतूक बिलापोटी कारखान्याने 16 कोटी 80 लाख बँकेत जमा केले आहे. ऊस व तोडणी वाहतूक बिलाची मिळून 84 कोटी 97 लाख रक्कम शेतक-यांच्या  व वाहनमालकांच्या खात्यावर जमा करणेत आले आहेत.

चौकट-

कारखान्याने 10 दिवसाला ऊस बिले देण्याची परंपरा कायम राखली असून 31 जानेवारी अखेर ऊस बिल व 15 जानेवारी अखेर ऊस तोडणी वाहतूक बील अदा करणारा एकमेव कारखाना आहे.

चौकट

1 ते 28 फेब्रुवारी दरम्यान गाळपास येणा-या ऊसास अनुदानासह प्रतिटन रू.2800/- व 1 मार्च पासून पुढे गाळपास येणा-या ऊसास प्रति टन रू.2850/- प्रमाणे उत्तेजनार्थ वाढीव ऊस दर सर्व ऊस पुरवठादार सभासद यांना मिळणार  आहे
तरी सभासद व ऊस पुरवठादार शेतकऱ्यांनी आपला सर्व ऊस विठ्ठलराव शिंदे कारखान्याचे युनिट नं.1 पिंपळनेर व युनिट नं.2 करकंब कारखान्यास पुरवठा करुन सहकार्य करावे असे आवाहन संस्थापक अध्यक्ष आ.बबनराव शिंदे यांनी केले .सदरप्रसंगी कारखान्याचे सर्व संचालक मंडळ, कार्यकारी संचालक, जनरल मॅनेजर व इतर अधिकारी उपस्थित होते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा