सनराइज् इंग्लिश मीडियम स्कूल मधील विद्यार्थिनीची तिरंदाजी ( धनुर्विद्या ) स्पर्धेमध्ये विभागीय स्तरावरती निवड.
माऊली शिक्षण प्रसारक मंडळ व सनराइज इंग्लिश मीडियम स्कूल मधील विद्यार्थिनी कुमारी प्रगती गणेश कोरडे हिची नुकत्याच आरण या ठिकाणी झालेल्या जिल्हास्तरीय तिरंदाजी ( धनुर्विद्या ) स्पर्धेमध्ये विभागीय स्तरावरती निवड झाली.
क्रीडा व युवक सेवा संचलनालय महाराष्ट्र राज्य पुणे अंतर्गत जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय जिल्हा क्रीडा परिषद सोलापूर यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित जिल्हास्तरीय धनुर्विद्या स्पर्धा 2023-24 संत सावता माळी विद्यालय आरण तालुका माढा जिल्हा सोलापूर येथे पार पडल्या.यामध्ये प्रशालेतील विद्यार्थ्यांनी चांगली कामगिरी केली. या कामगिरी बद्दल संस्थेचे अध्यक्ष श्री योगेश (बाबाराजे) बोबडे तसेच संस्थेच्या सचिवा सौ सुरजाताई योगेश बोबडे मॅडम यांनीही विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले. विद्यार्थ्यांचा सराव व त्यांची मेहनत भविष्यामध्ये त्यांना खूप मोठ्या स्तरापर्यंत घेऊन जाईल असे मत या ठिकाणी संस्थेच्या अकॅडेमीक डायरेक्टर व प्रशालेच्या प्रिन्सिपल शाहिदा पठाण मॅडम यांनी व्यक्त केले. प्रगतीला मार्गदर्शन करणारे क्रीडाशिक्षक गणेश देवकते सर तसेच राहुल काळे सर यांचेही संस्थेने अभिनंदन केले.तसेच प्रगती कोरडे हिच्या पुढील स्पर्धांसाठी शुभेच्छा ही देण्यात आल्या.


कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा