Breaking

शनिवार, १६ सप्टेंबर, २०२३

अपघातामध्ये मृत्यूस कारणीभूत ठरलेल्या आरोपीची निर्दोष मुक्तता*



*अपघातामध्ये मृत्यूस कारणीभूत ठरलेल्या आरोपीची निर्दोष मुक्तता


टेंभुर्णी प्रतिनिधी/अपघातामध्ये मृत्यूस कारणीभूत ठरलेल्या आरोपीची निर्दोष मुक्तता नुकतीच माढा न्यायालयाने निकाल दिला आहे .

 सविस्तर माहिती अशी की  यातील फिर्यादीची वडील नामे सर्जेराव संदिपान आसबे हे दि.3/5/2017 रोजी शिराळ( टें) येथून चोभेपिंपरी येथे जात असताना पुणे सोलापूर हायवेवरील शिराळ( टें) पाटी जवळ यातील आरोपी नामे भास्कर नागनाथ चव्हाण याचा टेम्पो क्रमांक एम एच 45 -85 16 ने भरधाव वेगाने हयगइने व बेजबाबदारपणे चालवून सर्जेराव संदिपान आसबे यांचे मोटर सायकल ला पाठीमागून जोराची धडक देऊन सर्जेराव आजबे यांचे मृत्यूस कारणीभूत आहेत अशा आरोपाखाली यातील आरोपी नामे भास्कर नागनाथ चव्हाण राहणार जामगाव तालुका माढा यांच्यावर भा द वि कलम 279 304-अ व तसेच मोटार वाहन कायद्याचे कलम 184 प्रमाणे टेंभुर्णी पोलीस स्टेशन येथे सी आर नंबर 181/ 2017 नुसार गुन्हा दाखल झालेला होता सदर केस कामे सरकार पक्षातर्फे तीन साक्षीदार तपासण्यात आले व जाबजबाब सर्व घेण्यात येऊन साक्षीदारांचे उलट तपास ॲड निलेश भोसले यांनी घेऊन व ॲड निलेश भोसले यांचा युक्तिवाद ग्राह्य धरत माढा न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश श्री वाय एस आखरे साहेब यांनी सदर आरोपीची निर्दोष मुक्तता केली सरकार पक्षातर्फे  ॲड   सक्री यांनी काम पाहिले तर आरोपी पक्षातर्फे ॲड. निलेश भोसले यांनी काम पाहिले

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा