Breaking

शनिवार, १६ सप्टेंबर, २०२३

शेतकऱ्यांच्या प्रश्नासंदर्भात लवकरच सरकारशी बैठक लाऊ▪️खा. शरद पवार यांची जनशक्तीचे अतुल खूपसे-पाटील यांना ग्वाही


शेतकऱ्यांच्या प्रश्नासंदर्भात लवकरच सरकारशी बैठक लाऊ
▪️खा. शरद पवार यांची जनशक्तीचे अतुल खूपसे-पाटील यांना ग्वाही


 प्रतिनिधी
 गतवर्षीचा गळीत हंगाम बंद होऊन सुमारे सहा ते सात महिने होऊन गेले तरीही करमाळा तालुक्यातील मकाई कारखान्याने अद्याप शेतकऱ्यांची बिले दिली नाहीत. तर कमलाई चे देणे बाकी आहे. शेतकऱ्यांच्या हाता-खिशात पैसा नसल्यामुळे शेतकरी घाईकुतीला आला आहे. तर दुसरीकडे  सोलापूर जिल्ह्यात पावसाचा कसलाच जोर नसल्याने दुष्काळ सदृश्य परिस्थिती निर्माण झाली आहे. यामुळे शेतातील उभी पिके होरपळून जात आहेत तर जनावरांना चाऱ्याचा प्रश्न उद्भवत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांची सरसकट विज बिल माफी करावी या मागणीसाठी जनशक्ती संघटनेचे अतुल खूपसे पाटील यांनी ज्येष्ठ नेते शरद पवार यांची भेट घेतली आणि शेतकऱ्यांबद्दलच्या व्यथा मांडल्या. यावेळी शेतकऱ्यांच्या या प्रश्नाबद्दल आपण लवकरच सरकारशी बैठक लावून अशी ग्वाही दिली असल्याचे अतुल खूपसे पाटील यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले.

 पुढे बोलताना ते म्हणाले की, शेतकऱ्यांचे कैवारी म्हणून नेहमीच महाराष्ट्रातील शेतकरी शरद पवार यांच्याकडे आदराने पाहतो. त्यामुळे शेतकऱ्यांचे प्रश्न घेऊन जनशक्ती संघटना आज जेष्ठ नेते शरद पवार यांच्याकडे गेली होती. यावेळी शेतकऱ्यांच्या या प्रश्नांसाठी त्यांनी सुमारे 45 मिनिटात दिले आणि सर्वच व्यथा जाणून घेतल्या. या संदर्भात आपण लवकरच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व शिस्त मंडळ आणि प्रशासन यांच्याशी बैठक लावून असे आश्वासन त्यांनी अतुल खूपसे पाटील यांना दिले.

यावेळी प्रतापराव आरकिले, आदित्य बंडगर, विजय खुपसे, रोहन नाईकनवरे, दीपक खुपसे यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते.

▪️चौकट
बेकायदा उत्खननावर वेधले लक्ष
- इंदापूर तालुक्यातील म्हसोबाचीवाडी येथे विहीर खोदण्याचे नावाने बेकायदा उत्खनन सुरू होते. यामध्ये दुर्घटना होऊन चार कामगार मृत्युमुखी पावले. त्यामुळे इंदापूर तालुक्यातील होत असलेले असे बेकायदा उत्खनन बंद करावे यासाठी अतुल खूपसे पाटील यांनी शरद पवारांना ही बाब लक्षात आणून देत लक्ष वेधले.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा