*राज्यस्तरीय जिल कुणे डो चॅम्पियनशिप स्पर्धांमध्ये शिवतेज जगतापने कराटे स्पर्धेत गोल्ड मेडल पटकावले*
टेंभुर्णी (प्रतिनिधी)
चव्हाणवाडी (टें), तालुका माढा येथील शिवतेज भारत जगताप याने जिल कुने डो कराटे या राज्यस्तरीय चॅम्पियनशिप स्पर्धेत गोल्ड मेडल मिळविले आहे. सदर स्पर्धा राष्ट्रीय अध्यक्ष राज खतेब, राज्य उपाध्यक्ष सागर शेंडे, महासचिव अमोल जाधव, यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हाध्यक्ष महेश गावडे, जिल्हा सचिव दीपक माने, सहसचिव स्नेहदीप व्यवहारे, यांच्या उपस्थितीत घेण्यात आल्या होत्या. या कार्यक्रमाचे आयोजन परवेज शेख यांनी केले होते.
या बाबत सविस्तर मिळालेली माहिती अशी की जिल कूने डो असोसिएशन सोलापूर आयोजित नववी राज्यस्तरीय जिल कुणे डो चॅम्पियनशिप स्पर्धा 2023 श्री गणेश भवन इसबावी पंढरपूर येथे आज सकाळी संपन्न झाली.
या स्पर्धेमध्ये चव्हाणवाडीचे शिवतेज भारत जगताप यांनी गोल्ड मेडल मिळवून उत्कृष्ट यश संपादन केले. त्याला स्नेहदीप व्यवहारे यांचे मार्गदर्शन लाभले. या यशाबद्दल आमदार बबनदादा शिंदे पतसंस्थेचे चेअरमन अशोक मिस्कीन, चव्हाणवाडी ( टें) ग्रामपंचायतचे सरपंच नवनाथ शिंदे व ॲड सचिन चव्हाण यांच्या हस्ते शिवतेज भारत जगताप याचा जगताप वस्ती येथे हार घालून सत्कार करण्यात आला
या वेळी प्रमुख उपस्थिती मध्ये मा . उपसरपंच हनुमंत चव्हाण, संतोष जाधव, राष्ट्रवादी माढा तालुका उपाध्यक्ष संजय मिस्कील
सोलापूर जिल्हा मध्यवर्ती बँकेचे शाखा अधिकारी विष्णू भोसले,मा चेअरमन नरहरी नांगरे, संजय, सुवर्ण क्रांती बँकेचे मॅनेजर आसिफ काझी, दत्तात्रय भोसले, चव्हाणवाडी विकास सोसायटीचे तज्ञ संचालक बाळासाहेब चव्हाण, सौदागर नांगरे, तानाजी जगताप, बाळासाहेब जगताप, हरिदास जगताप,मा, भारतीय जनता पार्टीचे अल्पसंख्यांक तालुका अध्यक्ष जमाल काझी, अमोल नांगरे, टायगर ग्रुपचे आमिर काझी, सुनील भोसले,दैनिक शिवनिर्नय चे पत्रकार धनंजय भोसले, कुदरत काझी, समाधान मिस्किन,अतुल नांगरे,राहूल चव्हाण,रोहन चव्हाण,सागर भोसले,शुभम जगताप, अमोल जगताप, वैभव भोसले, समाधान नांगरे, उमेश भोसले,यांच्या सह जयश्री वाकसे यांनी अभिनंदन केले.


कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा