*साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांना जयंतीनिमित्त व लोकमान्य टिळक यांना पुण्यतिथीनिमित्त एल.जी .बनसुडे स्कूल मध्ये विनम्र अभिवादन*
बिगवण/ प्रतिनिधी
दि -१ ऑगस्ट युगपुरुष लोकमान्य टिळक यांची 103 वी पुण्यतिथी व साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांची जयंती एल.जी. बनसुडे पळसदेव येथे उत्साहाच्या वातावरणात साजरी करण्यात आली. यावेळी संस्थेचे अध्यक्ष आ.श्री. हनुमंत (नाना) बनसुडे यांनी विद्यार्थ्यांना लोकमान्य टिळक व अण्णाभाऊ साठे यांच्या जीवन चरित्र विषयी माहिती सांगितली तसे संस्थेच्या प्राचार्य वंदना मॅडम यांनी विद्यार्थ्यांना स्वतःचे आचरण कसे असावे याविषयी मार्गदर्शन केले. विद्यार्थ्यांनी या थोर नेत्यांचे मनोगत आपल्या भाषणातून व्यक्त केले. आजच्या कार्यक्रमासाठी संस्थेचे सचिव नितीन बनसुडे सर, सर्व विभागाचे विभाग प्रमुख तसेच शिक्षक वृंद व शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी यांच्या उपस्थितीत कार्यक्रम पार पाडला. आजच्या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शुभांगी मराडे व आभार प्रदर्शन ज्योती मारकड यांनी केले.


कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा