टेंभुर्णी शहर व परिसरात शांतता व सुव्यवस्था राखण्यासाठी कसोशीने प्रयत्न केले जातील....
नूतन पो. नि. दीपक पाटील
.....पत्रकारांनी सहकार्य करावे.
बेंबळे।प्रतिनिधी/मुकुंद रामदासी
aj24 taas News Maharashtra
टेंभुर्णी व परिसर कक्षेतील गावागावातून गुन्हेगारी रोखणे ,अवैध धंद्यावर वाचक ठेवणे, मुख्य रस्त्याना जोडणार्या लहान रस्त्यावरील अतिक्रमण हटवणे तसेच टेंभुर्णी शहर व परिसरात शांतता आणि सुव्यवस्था चांगली ठेवून सर्वसामान्य नागरिकांना दिलासा मिळवून देण्यासाठी सातत्याने मी व माझे सर्व सहकारी निश्चित प्रयत्नशील असतील व आमच्या या कार्यात टेंभुर्णी शहर व परिसरातील ग्रामीण पत्रकारांनी आम्हाला सहकार्य करावे असे प्रतिपादन टेंभुर्णी पोलीस स्टेशनचे नूतन पोलीस निरीक्षक दीपक पाटील यांनी केले आहे, मंगळवार दिनांक 18 रोजी पत्रकारांच्या समवेत चहापान कार्यक्रम प्रसंगी दीपक पाटील आपले मनोगत व्यक्त करत होते.
पत्रकारांच्या स्वागतानंतर दीपक पाटील म्हणाले की मी सांगली जिल्ह्यातील आहे परंतु सोलापूर जिल्ह्यात अनेक पोलीस स्टेशनमध्ये मी आजपर्यंत बरीच वर्षे सेवा केलेली आहे. पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नांना उत्तर देताना पाटील म्हणाले की रात्री तसेच दिवसा होणाऱ्या चोऱ्या रोखण्यासाठी कटाक्षाने लक्ष देण्यात येईल, ठीक ठिकाणी असलेले अवैध धंदे बंद केले जातील, शाळा कॉलेज किंवा इतर ठिकाणी मुलींची किंवा महिलांची होणारी छेडछाड थांबवण्यासाठी कडक उपाययोजना केल्या जातील, टेंभुर्णी शहरात व्यापारी व नागरिकांच्या सौजन्याने दहा लाख रुपयांचे सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात येतील . टेंभुर्णी पोलीस स्टेशन कार्यकक्षेतील 48 गावे व दुरक्षेत्र मोडनिंब तसेच बेंबळे ,आढेगाव व निमगाव बीट मधील प्रत्येक गावास मी भेट देणार असून तेथील नागरिकांच्या समस्या जाणून घेणार आहे व त्या ठिकाणी शांतता व सुव्यवस्था कायम ठेवण्यासाठी कसोशीने प्रयत्न केले जातील हे निश्चित.पो.नि. दीपक पाटील पुढे म्हणाले की कोणत्याही ठिकाणच्या गुन्ह्याची किंवा तक्रारीची चौकशी केल्याशिवाय गुन्हा दाखल केला जाणार नाही, यावेळी ॲट्रॉसिटी चा गुन्हा असो किंवा एकमेकांच्या विरुद्ध तक्रारीचा असो किंवा अन्य प्रकारे जाणून-बुजून केलेली तक्रार असो या सर्व बाबींची शहानिशा करूनच संबंधितावर गुन्हा दाखल केला जाइल व या ठिकाणी कुठल्याही राजकीय गाव पुढार्यांचा किंवा इतरांचा दबाव सहन केला जाणार नाही , गुन्हा दाखल झाल्यानंतर गुन्हेगारास शासन मिळेपर्यंत पाठपुरावा केला जाईल. ग्रामीण भागात देखील नागरिकांच्या सौजन्याने सीसीटीव्ही कॅमेरे बसवले जातील, ठिकठिकाणी रात्रीची गस्त वाढवली जाईल, पोलीस पाटील व पोलीस मित्र यांचे सहकार्याने प्रत्येक गावात शांतता व सुव्यवस्था कायम राखण्यासाठी प्रयत्न केले जातील.
चौकट......ड्रोन विषयी निश्चित माहिती मिळवली जाईल....
सध्या टेंभुर्णी, बेंबळे, घोटी, वरवडे, मोडनिंब पिंपळनेर, निमगाव .टे या भागात मागील सहा ते सात दिवसापासून, रात्रीचे वेळी साधारण नऊ ते 11 चे दरम्यान आकाशात एक ड्रोन फिरताना दिसते. याविषयी नागरिकांमधून अनेक तर्क वितर्क लढवले जात आहेत, परंतु निश्चित माहिती उपलब्ध होत नाही याविषयी आपण काय करणार...? असे विचारले असता पीआय पाटील म्हणाले की याविषयी निश्चित एक ते दोन दिवसात अधिकृत माहिती गोळा करून तुम्हाला कळवली जाईल.
या कार्यक्रमास दैनिक सकाळ चे पत्रकार नाना पाटील ,दै पुण्य नगरी चे मुकुंद रामदासी ,दै . पुढारी चे सिद्धेश्वर शिंदे, सदाशिव पवार ,सोपान ढगे ,विष्णू बिचकुले, सुभाष चव्हाण, गणेश चौगुले, अनिल जगताप, सचिन होदाडे,सज्जन शिंदे, गणेश पोळ, धनंजय भोसले, सुरवसे, निर्धार, आधी शहर व ग्रामीण भागातील बहुसंख्य पत्रकारासहित टेंभुर्णी पोलीस स्टेशनचे गिरमकर, साठे ,बबलू गाडे,गीरदार, व अन्य मान्यवर उपस्थित होते.


कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा