महाड व पोलादपूर तालुक्यात गावोगावी अनधिकृत रित्या दारू दुकानांचा सुळसुळाट?
महाड (मिलिंद माने). राज्य उत्पादन शुल्क खात्याच्या अधिकाऱ्यांच्या हप्ते खोरीमुळे महाड , पोलादपूर , श्रीवर्धन व महसळा या चार तालुक्यातील
गावोगावी अनधिकृत रित्या दारू धंद्यांनी उच्छाद मांडला असून नवीन तरुण पिढी व्यसनाधीन होत असताना अनधिकृत रित्या दारू धंद्यांना अभय देण्याचे काम राज्य उत्पादन शुल्क खात्याचे महाड येथील निरीक्षक दर्जाचे अधिकारी करीत असल्याने ग्रामीण भागातील जनता मेटाकुटीला आली आहे
महाड महाड येथे नवे नगर भागात राज्य उत्पादन शुल्क खात्याचे निरीक्षक दर्जाचे कार्यालय आहे या कार्यालयातून महाड पोलादपूर श्रीवर्धन व महसळा या चार तालुक्याचा कार्यभार हाकला जातो मात्र या कार्यालयात असणारे निरीक्षक व त्यांच्या हाताखाली काम करणारे कर्मचारी हे बेकायदेशीर दारू धंद्यांवर कारवाई करण्यापेक्षा अनधिकृत दारू धंद्यांना अभय देण्याचे काम करीत असल्याने या चार तालुक्यामधील ग्रामीण भागात गावोगावी व वाड्यावाड्यांवर मोठ्या प्रमाणावर अनधिकृत रित्या दारू विक्रीचे काम चालू असून त्याला महाड येथील निरीक्षक दर्जाचे अधिकारी जबाबदार असल्याचे ग्रामीण भागात जनतेकडून याबाबत वारंवार तक्रारी प्राप्त होत आहेत
महाड येथील निरीक्षक दर्जाच्या अधिकाऱ्यांच्या कार्यक्षेत्रात येणाऱ्या चार तालुक्यांमध्ये असणाऱ्या बियर शॉपी मध्ये मोठ्या प्रमाणावर बियर ऐवजी छुप्या पद्धतीने देशी-विदेशी दारू विकली जाते या सर्व गोष्टी राज्य उत्पादन शुल खात्याच्या अधिकाऱ्यांना माहिती असताना देखील त्यांच्यावर आज पर्यंत कारवाई केली गेली नाही
महाड येथील राज्य उत्पादन शुल्क खात्याच्या निरीक्षक दर्जाच्या कार्यालयात एक निरीक्षक दोन उपनिरीक्षक व तीन कर्मचारी एवढे कर्मचारी कार्यरत आहेत या कर्मचाऱ्यांनी चार तालुक्या मधील रेस्टॉरंट बार ,बिअर शॉपी ,वाईन शॉप यांच्यावर देखरेख ठेवण्याचे काम चालू असते


कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा