Breaking

शनिवार, १ जुलै, २०२३

नाना भैया युवा मंच वतीने ट्विंकल स्टार इंग्लिश स्कूल येथे शालेय साहित्याचे वाटप.


नाना भैया युवा मंच वतीने ट्विंकल स्टार इंग्लिश स्कूल येथे शालेय साहित्याचे वाटप.



टेंभुर्णी (प्रतिनिधी)
श्री स्वामी समर्थ बहुउद्देशीय शिक्षण संस्था संचलित टिंकल स्टार इंग्लिश स्कूल या शाळेमध्ये रावसाहेबनाना देशमुख यांच्या वाढदिवसानिमित्त आज नाना भैया युवा मंचावतीने वह्या पेन व शालेय वस्तूचे वाटप करण्यात आले.

          रावसाहेब देशमुख यांचा वाढदिवस टेंभुर्णी मध्ये विविध उपक्रमांनी साजरा करण्यात आला. यामध्ये ट्विंकल स्टार इंग्लिश स्कूलमध्ये सर्व विद्यार्थ्यांना शालेय वस्तूचे वाटप केले. या कार्यक्रमाचे प्रस्तावना प्राध्यापक अमर भानवसे यांनी केले. यावेळी शैक्षणिक व सामाजिक उपक्रमाबाबत आप्पा हवालदार, शैलेश ओहोळ, गोरख देशमुख यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. नानांच्या वाढदिवसानिमित्त विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या. यावेळी गोरख देशमुख, गणेश केचे, शैलेश ओहोळ, प्रशांत देशमुख, नाना भोसले, आप्पा हवलदार, अमित देशमुख, विशाल हवलदार, बाळासाहेब बारवे, शाळेचे संस्थापक हरिश्चंद्र गाडेकर, प्रिन्सिपल रेखा गाडेकर, सचिव अर्चना गाडेकर, धनंजय भोसले, प्रा अमर भानवसे, प्रा स्नेहल चंदनकर, प्रा तेजश्री सुतार, मनीषा सोनवणे, प्रेरणा कातोरे, दिपाली सितारे, सोमनाथ खरसांडे, व पालक वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होता. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन स्नेहल चंदनकर यांनी केले व आभार प्रेरणा कातोरे यांनी मानले.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा