एकनाथराव चिपळूण - महाबळेश्वर व्हाया कांदोशी -साईधाम बिजघर राज्यमार्गाला चालना द्या - सदानंदराव भोसले
ठाणे ( प्रतिनिधी) महाबळेश्वर चिपळूण व्हाया कांदोषी, आंबवली, साईधाम बिजघर, गुनदे, आवाशी,लोटे परशुराम एम. आय. डी. सी. मार्गे चिपळूण राज्य मार्ग प्रस्तावित असुन कमी वेळेत इंधनाची, पैशाची बचत करणारा ठरणार असल्याने १८ गाव बांद्री पट्यातील असंख्य खेड्यांना वरदान ठरणारा असुन दळणवळण सुकर होईल व संपुर्ण भागाचा विकास होऊन हा प्रदेश सुजलाम सुफलाम होईल. या भागातील छोटे मोठे धरण प्रकल्प पूर्णत्वास गेल्यास येथील निसर्गाने मुक्त हस्ते केलेली उधळण पर्यटकांना आकर्षित करतात या भागातील डोंगर दऱ्या, उंच उंच कडे, सह्याद्रीच्या पर्वत रांगा, जगबुडी नदी उगम पावते तो नयनरम्य परिसर सर्वच मनमोहक असं दृष असुन या भागात पर्यटनाला मोठा वावं आहे तरी राज्याचे मुख्यमंत्री ना. एकनाथराव शिंदे या बाबत गांभीर्याने दखल घेऊन कामाला गती देवून आर्थिक नियोजन करावं अशी विनंती मराठा क्रांती स्वराज्य संघटना राष्ट्रीय संस्थापक अध्यक्ष सदानंदराव भोसले यांनी केली.
या बाबत बोलताना भोसले यांनी सांगितले हातलोट घाटातील जंगल विभागातील पर्यावरण विभागाच्या परवांग्या मिळाल्या आहेत. वाडा फाटा ते गोवा हाइवे वरील गुंनदे फाटा असा हा नवा राज्य मार्ग प्रस्तावित असुन त्या करिता त्वरीत निधीची तरतूद करण्यात यावी अशी मागणीही यावेळी भोसले यांनी केली आहे. आमचे एक सहकारी व शिवसेना पक्षाचे समन्वयक ठाणे माजी महापौर संजय मोरे देखील कांदोषी गावचे सुपुत्र असुन एकनाथराव यांचे विश्वासू सहकारी आहेत. या पूर्वी आम्हा तिघांची या बाबत चर्चा झाली होती मात्र तो काळ कोरोना वेळेचा होता व सरकारच्या तिजोरीत खडखडाट होता. जनसामान्यांच्या सदिच्छा व या भागातील देवदेवतांचे आशीर्वाद एकनाथराव यांचे मागे आहेत. तातडीने अंमलबजावणी करणे बाबत आदेश पुरेसा आहे, नक्कीच या तीन तालुक्यांना जोडणारा सलग्न राज्य मार्ग या भागाचा कायापालट करेल, विकासाला हातभार लावण्यासाठी मदतरूप ठरेल असे बोलताना मराठा क्रांती स्वराज्य संघटना राष्ट्रीय संस्थापक अध्यक्ष सदानंदराव भोसले यांनी सांगितले


कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा