Breaking

रविवार, ४ जून, २०२३

काटीच्या राणारणविरसिंह देशमुख यांने दहावी परिक्षेत प्राप्त केले 96.80 टक्के गुण.



काटीच्या राणारणविरसिंह देशमुख यांने दहावी परिक्षेत प्राप्त केले 96.80 टक्के गुण.



प्रतिनिधी रुपेश डोलारे धाराशिव 

 तुळजापूर तालुक्यातील काटी येथील राणारणविरसिंह विक्रमसिंह देशमुख या छत्रपती हायस्कूल धाराशिवच्या विद्यार्थ्याने इयत्ता दहावी परिक्षेत घवघवीत यश संपादन करीत 96.80 टक्के गुण घेऊन अभिनंदनीय यश संपादन केले. राणारणविरसिंह देशमुख हा विद्यार्थी भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष विक्रमसिंह देशमुख यांचे चिरंजीव आहेत.

राणारणविरसिंह हा विद्यार्थी छत्रपती हायस्कूल, धाराशिव मध्ये शिक्षण घेत असून त्याने वर्षेभर अथक परिश्रम घेत मराठी विषयात 100  पैकी 91 संस्कृत मध्ये 100 पैकी 95, इंग्रजी 84, गणित 92 तर सायन्स ॲंन्ड टेक्नॉलॉजी विषयात 100 पैकी 99 व सोशल सायन्स या विषयात 100 पैकी 97 गुण प्राप्त झाले आहेत.

त्यास गुरुजणांचे, पालकांचे मार्गदर्शन लाभले. त्याच्या या यशाबद्दल मित्रपरिवार, नातेवाईक तसेच ग्रामस्थांमधून अभिनंदन होत आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा