ऊस पेटवून दिल्याच्या आरोपातून दोन आरोपींची निर्दोष मुक्तता
टेंभुर्णी/प्रतिनिधी
यात हकीकत अशी की, यातील फिर्यादी नामे रामचंद्र चांगदेव गोडगे राहणार रोपळे (क) ता. माढा, जि.सोलापूर यांचे शेत जमीन गट नं. 545 /7 मधील 54 आर क्षेत्रातील ऊस दि. 26 /4 /2011 रोजी दुपारी 3 वाजता यातील आरोपी नामे भीमराव मालू माळी व रामभाऊ उर्फ रामदेव मालू माळी यांनी शेतीच्या वादातून फिर्यादी यांचा ऊस फिर्यादीची पत्नी नामे निरंजनी यांच्यासमोर पेटवून देऊन ऊस व ऊसातील पाईप असे मिळून 1,25,000/-(एक लाख पंचवीस हजार )रुपयांचे आर्थिक नुकसान झाल्याची फिर्याद कुर्डूवाडी पोलीस स्टेशन येथे दिलेली होती. त्यानंतर आरोपींच्या विरोधात कुर्डूवाडी पोलिसांनी भा.द.वि. कलम 435,427 व 34 प्रमाणे दोषारोपपत्र सादर केले .
सदरची केस माढा न्यायालयात चालू झाली. यात फिर्यादी तर्फे सहा साक्षीदार तपासण्यात येऊन जबाब नोंदविण्यात आले व आरोपीतर्फे ऍड. एन. एल. भोसले साहेब यांनी सर्व साक्षीदारांची उलट तपास घेतला त्यानंतर ऍड एन .एल .भोसले यांचा युक्तिवाद ग्राह्य धरत यातील आरोपी नामे भीमराव मालू माळी व रामभाऊ उर्फ रामदेव मालू माळी यांची यापूर्वी यातील आरोपी व फिर्यादी यांचा शेत जमिनी बाबत वाद चालू होता, फिर्याद देण्यास दोन दिवसांचा विलंब, तपासीय पोलीस अधिकारी यांनी जवळ असलेली फिर्यादीची पत्नीचे व्यतिरिक्त जबाब नोंदवले नाहीत, आरोपींचा सदर घटनेबाबतचा सहभागाबाबत सबळ पुरावा उपलब्ध नाही, फिर्यादीच्या पत्नीसमोर आरोपींनी ऊस पेटवला होता याबाबत निष्कर्ष काढता येणार नाही वगैरेबाबत प्रथम वर्ग न्याय दंडाधिकारी श्री .वाय .एस .आखरे साहेब यांनी आदेशाने नोंदविण्यात येऊन यातील आरोपींची निर्दोष मुक्तता केली, यात सरकार पक्षातर्फे ऍड एन. व्ही .कांबळे यांनी काम पाहिले तर आरोपीतर्फे ऍड निलेश .ल. भोसले ( टेंभुर्णी) यांनी काम पाहिले.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा