Breaking

शुक्रवार, १९ मे, २०२३

दोन हजार रुपयांच्या नोटा चलनातून बंद होणार 30 सप्टेंबर पर्यंत दोन हजार रुपयाची नोट वैद्य राहणार!


दोन हजार रुपयांच्या नोटा चलनातून बंद होणार 30 सप्टेंबर पर्यंत दोन हजार रुपयाची नोट वैद्य राहणार!

मुंबई (मिलिंद माने). भारतीय रिझर्व बँकेने आता दोन हजार रुपयांच्या चलनी नोटा देशाच्या चलनातून बंद करण्याचा निर्णय घेतला असून त्यानुसार 30 सप्टेंबर पर्यंत दोन हजार रुपयांच्या नोटा चलनात वैद्य असतील त्यामुळे दोन हजार रुपयांच्या नोटा बदली करण्यासाठी बँकांमध्ये मोठ्या प्रमाणावर रांगा लागल्याचे चित्र 23 मे पासून संपूर्ण देशात दिसणार आहे
भारतीय रिझर्व बँकेने दोन हजार रुपयांच्या नोटा चलनातून मागे घेण्याचा निर्णय घेतला असून सन 2018 19 मध्ये दोन हजार रुपयांच्या नोटांची छपाई बंद करण्यात आली आहे आता काका दोन हजार रुपयांच्या नोटा बदलून घेण्यासाठी तीन महिन्याचा कालावधी देण्यात आला आहे
भारतीय रिझर्व बँकेने चलनातून दोन हजार रुपयांच्या नोटा बंद करण्याची घोषणा केली आहे मात्र सध्या चलनात असलेल्या व बाजारात ज्यांच्याकडे दोन हजार रुपयांच्या नोटा आहेत त्यांना या 30 सप्टेंबर पर्यंत चलनात वैद्य राहणार असल्याचे रिझर्व बँकेने सांगितले आहे
भारतीय रिझर्व बँकेने दोन हजार रुपयांच्या नोटा ज्या ग्राहकांकडे आहेत त्यांनी 23 मे पासून त्या नोटा बदलून घेण्यासाठी बँकेत जाऊन प्रक्रिया करून घ्यावी लागणार आहे एकावेळी फक्त ग्राहकाला वीस हजार रुपयांपर्यंतच्या नोटा बदलता येणार आहेत सन 2016 मध्ये नोटाबंदीनंतर दोन हजार रुपयाची नोट चलनामध्ये आली होती नोटाबंदी मध्ये 500 आणि हजार रुपयांच्या नोटा बंद करण्यात आल्या होत्या
सन 2016 17 या आर्थिक वर्षात दोन हजार रुपयांच्या35429.91. कोटी नोटा भारतीय रिझर्व बँकेने छापल्या होत्या त्यानंतर सन 2017- 18 मध्ये1115.07. कोटी नोटांच्या छपाई रिझर्व बँकेने केल्या होत्या तर सन 2018- 19 मध्ये. केवळ466.90. कुटी नोटांची छपाई भारतीय रिझर्व बँकेने केली होती
सन 2019 -20,2020-2021, व2021-2022. या तीन वर्षात दोन हजार रुपयांच्या एकही नोटांची छपाई भारतीय रिझर्व बँकेने केली नाही
संसदेमध्ये एक ऑगस्ट 2022 रोजी दिलेल्या उत्तरांमध्येNcRB. डेटानुसार सन 2016 ते 2020 या कालावधीत दोन हजार रुपयांच्या बनावट नोटांची संख्या 2,272 वरून2,44,834. पर्यंत गेली होती तर
दोन हजार रुपयांच्या नोटा चलनातून बंद करण्याचा निर्णय भारतीय रिझर्व बँकेने घेतल्याने आता ज्या गर्भ श्रीमंत व ज्या व्यापाऱ्यांनी दोन हजार रुपयांच्या नोटा चलनात न ठेवता काळाबाजार करून दडवून ठेवल्या होत्या ते व्यापारी आता त्यांच्याकडे कामाला असणाऱ्या नोकऱ्यांना सकाळपासून विविध बँकेत नोटा बदलून आणण्यासाठी रांगेत उभे राहण्यास सांगून नोटा बदलून घेण्यासाठी त्यांची धडपड झाल्याचे चित्र येत्या तीन महिन्यात पहावयास मिळणार आहे

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा