भारत हे आयुर्वेदाचे जागतिक केंद्र : प्रा. बक्सू
टेंभुर्णी: भारत ही जगाला आयुर्वेदिक संपदा पुरवणारी सगळ्यात मोठी बाजारपेठ असल्याने भविष्यात फार्मसी शिक्षणाला अधिक महत्त्व प्राप्त होईल असे प्रतिपादन प्रा. तोहित बक्सू यांनी केले. ते आर्या कॉलेज ऑफ फार्मसी, टेंभुर्णी येथे आयोजित केलेल्या परिसंवादात बोलत होते.
IPTDP चे (Institute Of Pharmaceutical Training Development and Place) प्रा. तोहीद बक्सू पुढे म्हणाले, फार्मसीनंतर असणाऱ्या वेगवेगळ्या संधी (Opportunity after Pharmacy), वाढत जात असणारी फार्मा इंडस्ट्री, कच्चा माल, आयुर्वेदिक मटेरीअल आणि त्यासाठी लागणारे मनुष्यबळ पुरवण्याचे सामर्थ्य भारताकडे आहे.
मेडीकल कोडिंग, औषध उत्पादन, कॉलिटी कंट्रोल, कॉलिटी ॲशुरन्ससाठी लागणारी आवश्यक कौशल्य यांवर त्यांनी सविस्तर मार्गदर्शन केले. यावेळी त्यांनी विद्यार्थ्याना भारतामध्ये तसेच बाहेरील देशात असणाऱ्या संधी आणि त्याला लागणारे साँफ्ट स्कील यावरही मार्गदर्शन केले.
यावेळी आर्या कॉलेज ऑफ फार्मसी, टेंभुर्णीचे प्राचार्य मा. श्री. धनंजय चव्हाण, प्रा.अमर डोके-पाटील, प्रा. तुषार कान्हरे, प्रा. संग्रामसिंह अनपट-भोसले, प्रा. साक्षी देवकर, प्रयोगशाळा तंत्रज्ञ अमृता कसबे, आयेशा शेख आणि सर्व विध्यार्थी उपस्थित होते.


कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा