राज्यस्तरीय व्याकरण स्पर्धा परीक्षेत बेंबळेचा प्रतीक भोसले तृतीय स्थानावर...
बेंबळे। प्रतिनिधी।
फेब्रुवारी 2023 मध्ये राज्यस्तरीय माय मराठी व्याकरण आँलंपियाड स्पर्धा परीक्षेमध्ये बेंबळे येथील प्रतीक मोहन भोसले या विद्यार्थ्याने तृतीय क्रमांक मिळवला आहे, प्रतीक हा आर्या पब्लिक स्कूल पिंपळनेर या प्रशालेतील इयत्ता सातवी मधील विद्यार्थी आहे. या परीक्षेसाठी महाराष्ट्रातील नामवंत प्रशालेतील शेकडो विद्यार्थी बसले होते. या परिक्षेत निमगाव केतकी येथील अलोक भोंग प्रथम क्रमांक, दौंड प्रशालेतील अनुष्का टेकवडे द्वितीय क्रमांक तर बेंबळेचा प्रतीक भोसले या तृतीय क्रमांकावर आहे.
बेंबळे येथील श्री विमलेश्वर ज्युनिअर कॉलेजमधील प्राध्यापक मोहन भोसले यांचा प्रतीक हा मुलगा आहे, या यशाबद्दल आर्या पब्लिक स्कूलचे संस्थापक रणजीतसिंह शिंदे, शिक्षण संस्थेच्या अध्यक्षा प्रणिता शिंदे, प्राचार्य रवींद्र लोखंडे बेंबळ्याचे सरपंच विजय पवार उपसरपंच नमिता अनपट माजी सरपंच कैलास भोसले पंचायत समितीच्या माजी सदस्या संजीवनी भोसले पत्रकार सिद्धेश्वर शिंदे, सज्जन शिंदे, मुकुंद रामदासी ,सचिन जगताप यांचे सह अनेक मान्यवरांनी प्रतिकचे अभिनंदन केले आहे. प्रतीक भोसले यास प्राध्यापक प्रमोद जाधव, संतोष भांडवलकर व नागनाथ लोंढे याशिक्षकांचे मार्गदर्शन लाभले.


कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा