
मोठी स्वप्न पाहून ती पुर्ण करण्यासाठी विद्यार्थ्यांनी अविरत प्रयत्न करावा - खरात
(पिंपळनेर प्रतिनिधी) महेश देशमुख
विद्यार्थी व पालकांनी मोठी स्वप्न पाहून ती पुर्ण करण्यासाठी अविरत प्रयत्न करावा व पालकांनीही त्याला साथ द्यावी तर ते विद्यार्थी यशस्वी होतील असे मत यशोदिप क्लासेसचे संचालक तानाजी खरात यांनी व्यक्त केले.
मंथन प्रज्ञाशोध परीक्षेत इयत्ता तिसरीत शिकणाऱ्या काव्या निलेश देशमुख हिने ३०० पैकी २९६ गुण मिळवून राज्यात दुसरा क्रमांक मिळविल्याबद्दल यशोदिप क्लासेस, कुर्डूवाडीच्या वतीने तिचा क्लासेसचे संचालक तानाजी खरात यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.यावेळी पुढे बोलताना खरात म्हणाले, प्रज्ञाशोध परीक्षा या विद्यार्थ्यांसाठी संपूर्णपणे स्पर्धा परीक्षेच्या धर्तीवर घेण्यात येतात. त्यामुळे भविष्यातील विविध स्पर्धा परीक्षांची पुर्व तयारी होते. याप्रसंगी निलेश देशमुख यांनी आपले मनोगत व्यक्त करताना एखाद्या परीक्षेत किती गुण मिळाले हे महत्वाचे नाही तर अविरतपणे हे यश टिकविण्यासाठी विद्यार्थी व पालकांनी प्रयत्न केले तरच त्या विद्यार्थांचे व पालकाचे स्वप्न पूर्ण होईल, मोठी स्वप्न पहा व ती पुर्ण करण्यासाठी अविरत प्रयत्नशील रहा. नक्कीच तुम्ही त्या स्वप्नाला पुर्ण केलेले असेल असे सांगितले. याप्रसंगी शिवाजी गवळी यांच्यासह पालक व विद्यार्थी उपस्थित होते.



कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा