Breaking

बुधवार, १५ फेब्रुवारी, २०२३

विठ्ठलराव शिंदे पिंपळनेर युनिट -१ व करकंब युनिट-२........एकुण 19 लाख 21 हजार मे.टन ऊस गाळप.... 2350 रुपये प्रति टन प्रमाणे 436 कोटी रु. शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा.... 16 ते 28 फेब्रुवारी पर्यंत 75 रुपये प्रति टन तर 1 मार्चपासून पुढील उसाला 150 रुपये प्रति टन एफ्आरपी पेक्षा ज्यादा दर देणार....... आ.बबनदादा शिंदे



विठ्ठलराव शिंदे पिंपळनेर युनिट -१ व करकंब युनिट-२........
एकुण 19 लाख 21 हजार मे.टन ऊस गाळप....

 2350 रुपये प्रति टन प्रमाणे 436 कोटी रु. शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा....

 16 ते 28 फेब्रुवारी पर्यंत 75 रुपये प्रति टन तर
 1 मार्चपासून पुढील उसाला 150 रुपये प्रति टन एफ्आरपी पेक्षा ज्यादा दर देणार..........
                                  आ.बबनदादा शिंदे  

            विठ्ठलराव शिंदे सहकारी साखर कारखाना पिंपळनेर युनिट एक व करकंब युनिट दोन मध्ये आज पर्यंत 19 लाख 21 हजार 762 मेट्रिक टन उसाचे गाळप करण्यात आले असून कारखान्याने आज पर्यंत गळी़तास आलेल्या उसाचे  2350रु. प्रति टन प्रमाणे पहिले बिल प्रत्येक दहा दिवसाला शेतकऱ्यांच्या बँकखात्यात जमा केलेले आहे ,त्यानुसार आता 10 फेब्रुवारी 23 अखेर पर्यंत पहिले ऍडव्हान्स बिल 2350 रुपये प्रति टन प्रमाणे दोन्ही युनिटमध्ये एकूण 436 कोटी रुपये शेतकऱ्यांच्या खात्यावर  बिल जमा करण्यात आले आहे. त्याचप्रमाणे दोन्ही युनिटमध्ये 31 जानेवारी 23 अखेर पर्यंत ची ऊस तोडणी वाहतुकीची 114 कोटी रुपयांची बिले पण अदा करण्यात आलेली आहेत. पिंपळनेर युनिट एक चा साखर उतारा (रिकव्हरी) 11.16% असून करकंब युनिट दोनचा साखर उतारा (रिकव्हरी) 11:25 % असल्याची माहिती या दोन्ही युनिटचे संस्थापक अध्यक्ष आमदार बबनदादा शिंदे यांनी दिलेली आहे. याप्रसंगी कारखान्याचे व्हाईस चेअरमन वामनभाऊ उबाळे कारखान्याचे संचालक तथा जिल्हा दूध संघाचे अध्यक्ष रणजितभैय्या शिंदे कार्यकारी संचालक संतोष दिग्रजे,केन मॅनेजर संभाजी थीटे जनरल मॅनेजर सुहास यादव शेतकी अधिकारी सुनील बंडगर व बाबुराव इंगवले फायनान्स मॅनेजर दिलीप लवटे व लेखाप्रमुख सतीश गोडसे आदी मान्यवर उपस्थित होते.
        अधिक माहिती देताना आमदार बबनदादा शिंदे म्हणाले की गळीत हंगाम सुरू होऊन चार महिने होत आलेले आहेत. पिंपळनेर युनिट एक मध्ये 14 लाख 71 हजार 101 मेट्रिक टन तर करकंब युनिट दोन मध्ये चार लाख 50 हजार 661 मेट्रिक टन असे एकूण 19 लाख 21 हजार 762 मे.टन उसाचे गाळप करण्यात आले आहे व 2350रु.प्रतिटन प्रमाणे 10 फेब्रुवारी 23 अखेरपर्यंत युनिट एक व युनिट दोन मध्ये एकूण 436 कोटी 16 लाख 53 हजार 192 रुपये शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करण्यात आलेले आहेत. आमदार शिंदे पुढे म्हणाले की सध्या यापुढे उन्हाळा वाढू लागला आहे अद्याप कारखाना कार्यक्षेत्रामध्ये गळीतासाठी बऱ्याच प्रमाणात ऊस उपलब्ध आहे, त्यामुळे 16 ते 28 फेब्रुवारी पर्यंत गळीतास येणाऱ्या उसाला एफ आर पी पेक्षा 75 रुपये प्रतिटन जादा दर तर एक मार्चपासून पुढे गळीतास येणाऱ्या उसाला 150 रुपये प्रति टन जादा दर देण्यात येणार आहे.
           चालू 2022-2023 गळीत हंगामातील ऊसाला तोडणी वाहतूक वजा जाता 2620 रुपये प्रति टन एफ आर पी दिली जाणार आहे, त्यामुळे 16 ते 28 फेब्रुवारी पर्यंत येणाऱ्या उसाला प्रति टन 2695 रुपये व एक मार्च नंतर येणाऱ्या उसाला 
2770 रुपये प्रति टन  दर दिला जाणार आहे. पिंपळनेर युनिट एक मध्ये प्रतिदिन सरासरी 12 ते 13 हजार मे.टन तर करकंब युनिट दोन मध्ये 3500 ते 4000 मे.टन प्रतिदिन गाळप केले जात आहे, प्रसंगी 15 मार्च नंतर देखील काही दिवस कारखाना चालवला जाईल परंतु कोणाचाही ऊस गळीताअभावी शिल्लक ठेवणार नसल्याचे आमदार बबनदादा शिंदे यांनी आवर्जून सांगितले.

 चौकट.....

         ऊस वाहतूक व तोडणी मजूर शेतकऱ्यांना ऊस तोडणी साठी पैशाची मागणी करत आहेत परंतु अशा ठिकाणी शेतकऱ्यांनी ऊस तोडण्यासाठी किंवा वाहतुकीसाठी पैसे न देता आमच्याकडे तक्रार केल्यास आम्ही संबंधित वाहन मालक व तोडणी मजूर यांचेवर कडक कारवाई करणार आहोत, त्यामुळे शेतकऱ्यांनी ऊस तोडण्यासाठी पैसे देऊ नयेत,

                                   संतोष डिग्रजे
                              कार्यकारी संचालक


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा