*पिकविमा कंपनी व प्रशासनाच्या लेखी आश्वासनानंतर मनसेचे औसा तहसील समोर सुरू केलेले बेमुदत धरणे आंदोलन मागे.*
*लातूर प्रतिनिधी/ज्ञानेश्वर सूर्यवंशी*
औसा तालुक्यासह लातूर जिल्ह्यातील पिकविमाधारक शेतकऱ्यांना खरीप हंगाम २०२२ चा पिकविमा परतावा देत असताना पिकविमा कंपनीने मनमानी कारभार केला म्हणून तसेच जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यावर तुटपुंज्याजा रकमा जमा केल्याचे आढळून आल्याने तसेच उर्वरित पिकविमाधारक शेतकऱ्यांना अद्याप दमडीही देण्यात आली नसल्याने,तसेच पिकविमाधारक शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करण्यात आलेल्या या तुटपुंज्या रकमा कुठल्या आधारे व निकषद्वारे दिल्या गेल्या व उर्वरित शेतकऱ्यांना पिकविमा का मिळत नाही अशी विचारणा केली असता शासन,प्रशासन,कृषी विभाग व पिकविमा कंपनीचे अधिकारी उडवाउडवीचे उत्तरे देत असल्याने महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने पिकविमा खात्यावर जमा होत नाही तोपर्यंत आज दि.२४ जानेवारी २०२३ सकाळी ११ पासून औसा तहसील कार्यालयासमोर धरणे आंदोलन केले सुरू करण्यात आले होते.
परंतु पिक विमा कंपनीचे प्रतिनिधी व नायब तहसीलदार मा.सुरेश पाटील साहेबांनी जानेवारीच्या (चालू महिन्याच्या) अखेरपर्यंत पिकविमाधारक सर्व शेतकऱ्यांना पिकविमा वाटप केला जाईल असे लेखी आश्वासन दिल्यानंतर सदरील ठिकाणी सुरू केलेले उपोषण मागे घेण्यात आले.याप्रसंगी मनसेचे लातूर जिल्हा अध्यक्ष शिवकुमार नागराळे,जिल्हा सचिव धनराज गिरी,तालुका अध्यक्ष मुकेश देशमाने,विधानसभा संघटक महेश बनसोडे कृषीचे तालुका अध्यक्ष गोविंद चव्हाण शहराध्यक्ष प्रवीण कटारे तालुका सचिव विकास लांडगे,तानाजी गरड,जीवन जंगाले अमोल थोरात,किशोर आगलावे, सुधीर चव्हाण, शंकर चव्हाण,वैभव सूर्यवंशी गणेश सूर्यवंशी,विवेक दुधनकर,संतोष कोल्हापुरे,गुणवंत लोहार,ज्ञानेश्वर कदम,राजेंद्र कांबळे इत्यादी कार्यकर्ते पदाधिकारी व शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.


कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा