टेंभुर्णी : - माढा तालुक्यातील सुर्ली ग्रामपंचायतच्या रिक्त सरपंचपदी स्वाती संतोष कदम यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे.
सुर्ली ग्रामपंचायतचे माजी सरपंच सुरेश पवार यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिल्याने त्यांच्या रिक्त जागेची निवडणूक झाली.निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून एस.जी.कोरबू मॅडम यांनी काम पाहिले.त्यांना तलाठी प्रशांत जाधव व ग्रामसेवक राजेश माळी यांनी मदत केली.
निवडीनंतर लेबर फेडरेशनचे माजी चेअरमन भारत पाटील,महादेव पवार,माजी सरपंच सुरेश पवार,संतोष कदम,उपसरपंच वेताळा कोयले,सदस्य डॉ.प्रियांका काळे,शरीफा शेख,आशा जगताप,पंडित जाधव,तंटामुक्त गाव समितीचे प्रमुख विठ्ठल काळे,दत्तात्रय जगताप,पोलीस पाटील सूर्यकांत काळे,अकोले खुर्दचे माजी सरपंच रामभाऊ पाटील,विक्रम पाटील,लक्ष्मण काळे,बंडू सातव,लक्ष्मण काळे,पोहेकॉ पंढरीनाथ आरकिले,दादा बनसोडे यांच्यासह मान्यवर ग्रामस्थ उपस्थित होते.


कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा