Breaking

मंगळवार, २० डिसेंबर, २०२२

काळमवाडी ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी जय हनुमान ग्रामविकास पॅनलचे भुजंगराव शिंगाडे विजयी ,विरोधी गटास तिन जागा


काळमवाडी ग्रामपंचायतीच्या  सरपंचपदी जय हनुमान  ग्रामविकास  पॅनलचे भुजंगराव शिंगाडे  विजयी ,विरोधी गटास तिन जागा


पिलीव प्रतिनिधी- प्रमोद भैस

माळशिरस तालुक्यातील  काळमवाडी ग्रामपंचायतीच्या पंचवार्षिक निवडणुकीत  जय हनुमान  ग्रामविकास  पॅनलचे भुजंगराव शिंगाडे  हे 19 मताने विजयी झाले तर विरोधी  मोहीते पाटील  गटाला 3 जागांवर समाधान  मानावे लागले.जनतेतुन  सरपंच  पदाच्या  निवडीसाठी  जय हनुमान  ग्रामविकास  पॅनलचे भुजंगराव शिंगाडे  यांना 609 मते मिळाली तर विरोधी  गटाचे  सिद्धनाथ  ग्राम विकास  पॅनलचे दादासाहेब शिंगाडे  यांना 590 मते मिळाली  यामध्ये  19 मतांनी  भुजंगराव शिंगाडे  यांनी बाजी मारली तर यामध्ये  गेली  दहा वर्षे सत्तेत  असणाऱ्या  सिद्धनाथ  ग्रामविकास  पॅनलचे  प्रभाग एक मधील  तिन्ही  उमेदवार  विजयी  झाले  यामध्ये  पवार  सज्जन (२५३),ललीता सुळे (२२८),सविता घुले (२५५) तर प्रभाग  दोन मधुन जय हनुमान  ग्रामविकास  पॅनलचे  आवताडे बळवंत मचिंद्र(255), इंदलकर सुनिता(250),जाधव विमल (246)हे विजयी झाले  तर प्रभाग  तिन  मध्ये  सुद्धा  ह्याच पॅनलचे  देवकते विकास  ( 241),नंदा आवताडे (225),शिंदे  जगन्नाथ  (२३९) हे उमेदवार  विजयी  झाले  यामुळे सत्ताधारी मोहीते पाटील  समर्थक  सिद्धनाथ ग्रामविकास पॅनलला आपली दहा वर्षापासूनची सत्ता  गमवावी लागली तर तब्बल  दहा वर्षानी याठिकाणी  जय हनुमान  ग्रामविकास  पॅनलने याठिकाणी  सत्ता मिळविली. विजयानंतर  विजयी उमेदवारांनी गुलाल उधळत व फटाकयाची आतिषबाजी  करीत  आनदोसतव साजरा केला .
फोटो  - काळमवाडी ग्रामपंचायतीच्या निवडणुक निकालानंतर  जल्लोष  करताना विजयी उमेदवार व ग्रामस्थ

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा