Breaking

गुरुवार, १ डिसेंबर, २०२२

देशाचा जबाबदार नागरिक घडविणे हेच स्काऊट गाईडचे उद्दिष्ट - शिवशरण पाटील .



देशाचा जबाबदार नागरिक घडविणे  हेच स्काऊट गाईडचे उद्दिष्ट - शिवशरण पाटील .



कन्हेरगांव दि प्रतिनिधी ( धनंजय मोरे )

देशाचा एक जबाबदार नागरिक म्हणून देशाप्रती राष्ट्रप्रेम व आपले कर्तव्य आहे , त्याचे खऱ्या अर्थाने जाणीव करून देण्याचे कार्य स्काऊट गाईडच्या माध्यमातून होते , असे प्रतिपादन स्काऊट गाईडचे जिल्हा मास्टर शिवशरण पाटील यांनी केले.
            एक डिसेंबर रोजी सकाळी अकरा वाजता के.एन.भिसे आर्ट्स, कॉमर्स अँड विनायकराव पाटील सायन्स कॉलेज येथे महाविद्यालयीन स्तरावर स्काऊट अँड गाईडच्या उद्घाटन कार्यक्रम प्रसंगी ते बोलत होते . कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी प्राचार्य  डॉ .प्रकाश कांबळे होते .
               यावेळी मा.ह.महाडिक महाविद्यालयाचे स्काऊट गाईडचे विभाग प्रमुख  प्रा. हनुमंत पाटील ,  सतीश म्हेत्रे , एनसीसी चे विभागप्रमुख कॅप्टन महादेव थोरात , क्रीडाशिक्षक मनोज पाटील , धनंजय मोरे आदी उपस्थित होते .
           यावेळी प्राचार्य कांबळे म्हणाले की , योग्य शिक्षणासोबत सामाजिक , शारीरिक , बौद्धिक ,  आध्यात्मिक , मानसिक विकासासाठी गाईडचा उपयोग महत्त्वाचा आहे .भारतीय नौसेना,  वायुसेना , थलसेना आणि रेल्वे पद भरती मध्ये स्काऊट गाईडच्या विद्यार्थ्यांसाठी राखीव कोटा ठेवला जातो.
    एनसीसी चे विभाग प्रमुख थोरात म्हणाले की , हिंदुस्तान स्काऊट्स अँड गाईड्स संस्था ही युवा व खेळ मंत्रालय भारत सरकार  यांच्याकडून स्काऊट गाईड चे कार्य करण्यास मान्यता मिळालेली संस्था आहे. 
    सूत्रसंचालन भगवान बसके यांनी केले तर आभार क्रीडा शिक्षक मनोज पाटील यांनी मानले.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा