Breaking

गुरुवार, १ डिसेंबर, २०२२

15 हजार चा शेअर्स असणाऱ्या ऊस पुरवठादार सभासदास 30 किलो साखर मोफत देणार - आमदार संजयमामा शिंदे.


15 हजार चा शेअर्स असणाऱ्या ऊस पुरवठादार सभासदास 30 किलो साखर मोफत देणार - आमदार संजयमामा शिंदे.



कन्हेरगांव दि प्रतिनिधी ( धनंजय मोरे )


विठ्ठल कार्पोरेशन लि. म्हैसगाव या साखर कारखान्याचे सन  २०२३-२४ हंगामपुर्व आढावा धोरण मिटींगमध्ये कारखान्याचे  शेअर्स धारण करणाऱ्या सर्व ऊस पुरवठादार सभासदांना रक्कम रुपये 15 हजार चे प्रति शेअर्सला ३० किलो  आणि रुपये 15 हजार चे दोन शेअर्स धारण करणाऱ्या सभासदास 60 किलोग्रॅम साखर दीपावली सणाकरिता मोफत देणार  (शेअर्सच्या पटीत साखर मोफत देणार) असल्याचे , कारखान्याचे चेअरमन तथा करमाळा-माढा विधानसभा मतदारसंघाचे आमदार संजयमामा  शिंदे यांनी जाहीर केले आहे.
         ज्या ऊस उत्पादक  शेतकऱ्यांना कारखान्याचे शेअर्स घ्यावयाचे आहेत , त्यांनी कारखाना शेती विभागाशी संपर्क साधून शेअर्स घेण्याचे आवाहन आमदार संजयमामा शिंदे यांनी केले आहे. यावेळी विठ्ठल कार्पोरेशन साखर कारखान्याचे कार्यकारी संचालक यशवंत भैय्या शिंदे , मुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्रकुमार रणवरे आदी उपस्थित होते.




कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा