वांगी -3 च्या जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत बाल आनंद बाजार उत्साहात संपन्न!
टेंभुर्णी/प्रतिनिधी
जिल्हा परिषद प्राथमिक शाळा वांगी नंबर तीन ता. करमाळा मध्ये बाल आनंद बाजार उत्साहात पार पडला. वांगी नंबर 3 चे सरपंच मयूर रोकडे व उपसरपंच संतोष कांबळे यांच्या शुभहस्ते सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन करून व पुष्पहार अर्पण करून बाल आनंद बाजाराची सुरुवात करण्यात आली.
याप्रसंगी सरपंच मयूर रोकडे आपले विचार व्यक्त करताना पुढे म्हणाले, "काळाची गरज ओळखून आणि विद्यार्थ्यांच्या अंगचे कलागुण ओळखून असे शालेय व सहशालेय विविध प्रकारचे उपक्रम राबवून विद्यार्थ्यांना घडविण्याचे अतिशय मोलाचे काम या शाळेतील शिक्षक करत आहे ही आनंदाची गोष्ट आहे .या आनंद बाजारातून विद्यार्थ्यांना व्यवहार ज्ञान, नफा- तोटा, वजन काटा ,बाजार भाव इत्यादी संकल्पना प्रत्यक्षात अनुभवण्यासाठी, बाल आनंद बाजाराची संकल्पना प्रत्यक्षात उतरवून विद्यार्थ्यांना एका वेगळ्या विश्वात घेऊन जाण्याचा आपला प्रयत्न आणि उपक्रम स्तुत्य आहे. या उपक्रमासाठी आम्हा सर्वांतर्फे शुभेच्छा आहेत."
या आनंद बाजारामध्ये विद्यार्थ्यांनी पालेभाज्या ,फळभाज्या ,विविध प्रकारची फळे, तसेच भजी, समोसा, वडापाव ,भेळ ,लाडू, ओल्या शेंगा ,शालेय साहित्य ,स्टेशनरी इत्यादींची विक्री करण्यात आली. या बाजारातील विक्री करण्यासाठी ग्राहक म्हणून परिसरातील नागरिक, ग्रामस्थ ,पालक, आबाल- वृद्ध ,महिला, शिक्षक, तसेच रयत शिक्षण संस्थेच्या न्यू इंग्लिश स्कूल मधील विद्यार्थीही सहभागी झाले होते.
या सर्वांनी उस्फूर्तपणे सहभाग घेऊन मोठ्या प्रमाणात खरेदी केली.यामुळे ग्राहक विद्यार्थी ही खुश होते आणि यातून जवळजवळ 35 हजाराची उलाढाल झाली.
या कार्यक्रम प्रसंगी उपसरपंच संतोष कांबळे, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष- मारुती रोकडे, उपाध्यक्ष -रमेश भानवसे, सदस्य -अशोक वाघमोडे, महेंद्र शिंदे, लक्ष्मण गोडसे, सोमनाथ सुतार, बालाजी बळवंत, सतीश निंबाळकर ,मनोज तळेकर, अर्जुन पांढरमिसे,रामचंद्र रोकडे, सोमनाथ भानवसे,मुख्याध्यापक- देविदास खोडके, तसेच पालक, ग्रामस्थ मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.
हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शिक्षक- आदिनाथ राऊत, अतुल मुंडे, उज्वला भोंग यांचे सहकार्य लाभले.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आणि आभार प्रदर्शन शिक्षिका- शितल शिंदे यांनी केले.


कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा