महाराष्ट्र राज्य ग्रामसेवक युनियन DNE-136च्या राज्य सल्लागार या कॅबिनेट पदी मा श्री लक्ष्मण(तात्या) गलगुंडे यांची निवड .....
पालघर :- महाराष्ट्र राज्य ग्रामसेवक युनियनDNE-136 ची पंचवार्षिक निवडणुक संत नगरी श्री क्षेत्र शेगाव येथे नुकतीच पार पडली त्यामध्ये सदर निवडणूक बिनविरोध पार पडावी म्हणून राज्य अध्यक्ष या पदासाठी चा दाखल केलेला अर्ज श्री लक्ष्मण(तात्या)गलगुंडे यांनी माघारी घेत युनियन निवडणूक बिनविरोध पार पाडण्यासाठी महत्वाची भूमिका घेतली होती या भूमिकेमुळे राज्य युनियन निवडणूक बिनविरोध पार पडून राज्य अध्यक्ष पदी मा.श्री.संजीव (अप्पा)निकम जळगाव तर राज्य सरचिटणीस पदी मा.श्री. सूचित घरत(पालघर)यांची बिनविरोध निवड झाली व त्याच अनुषंगाने नूतन राज्य युनियनची त्रैमासिक सभा रविवार दि.13/11/2022 रोजी शितलाई देवी सभागृह पालघर जि.पालघर या ठिकाणी पार पडली त्यामध्ये ग्रामसेवक युनियनचे आत्तापर्यंत केलेल्या कार्याची दखल घेत माढा तालुक्यातील मौजे परिते गावचे ग्रामविकास अधिकारी मा. श्री.लक्ष्मण (तात्या) गळगुंडे यांची महाराष्ट्र राज्य ग्रामसेवक युनियन DNE-136 च्या राज्य सल्लागार या कॅबिनेट पदी बिनविरोध निवड राज्य अध्यक्ष श्री.संजीव निकम साहेब व कर्मचारी महासंघाचे अध्यक्ष श्री.उमेशचंद्रजी चिलबुले साहेब यांनी जाहीर केली गलगुंडे तात्यानी आत्तापर्यंत सोलापूर जिल्हा ग्रामसेवक युनियन चे जिल्हाअध्यक्ष,राज्य उपाध्यक्ष,राज्य कार्याध्यक्ष या पदावर उत्तम व संघटनात्मक काम केले असुन त्यांच्या कार्यकाळात सर्वसामान्य ग्रामसेवक यांचे वेतन त्रुटीचे प्रश्न,कंत्राटी कालावधी कमी करणे, ग्रामसेवक पद निर्मिती करणे,राज्य अधिवेशन, यासह अनेक प्रश्न सरकार कडून मार्गी लावले आहेत या निवडी बद्दल महाराष्ट्रातील सर्व ग्रामसेवक सभासदां मधून त्यांचे अभिनंदन होत आहे .......या कामी राज्य कॅबिनेट मंडळ,महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्याचे जिल्हाअध्यक्ष/सरचिटणीस व माढा तालुका ग्रामसेवक युनियन चे अध्यक्ष मा.श्री.औदुंबर शिंदे भाऊसाहेब तसेच सोलापुर जिल्ह्यातील इतर सर्व तालुका युनियनचे अध्यक्ष; सचिव व तात्या प्रेमी ग्रामसेवक बंधु भगिनी यांचे मोलाचे सहकार्य लाभले या प्रसंगी माढा तालुक्यातील श्री.भिमराव लोकरे,श्री.राजकुमार यादव, श्री.संजय साळुंके,श्री. समाधान सरडे व माढा तालुका सचिव श्री.राजेश माळी हे ग्रामसेवक उपस्थित होते


कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा