Breaking

बुधवार, ९ नोव्हेंबर, २०२२

संजय कोकाटे यांनी जिल्ह्यातील शेतकऱ्यांची जाहीर माफी मागावी - संजय पाटील भिमानगरकर.


संजय कोकाटे यांनी जिल्ह्यातील शेतकऱ्यांची  जाहीर माफी मागावी - संजय पाटील भिमानगरकर.



कन्हेरगांव दि प्रतिनिधी ( धनंजय मोरे )

टेंभूर्णी मध्ये मंगळवारी ऊसाला पहिला हप्ता २५०० रुपये मिळावा यासाठी संजय कोकाटे यांनी आंदोलन केले होते . यावेळी संजय कोकाटे यांनी शेतकऱ्यांना नामर्द असा उल्लेख केला आहे , त्यामुळे संजय कोकाटे यांनी जिल्ह्यातील शेतकऱ्यांची जाहीर माफी मागावी अशी मागणी , जिल्हा परिषदेचे माजी सभापती संजय पाटील भिमानगरकर यांनी केली आहे.
   बुधवारी ९ नोव्हेंबर रोजी जिल्हा परिषदचे माजी सभापती संजय पाटील भिमानगरकर यांनी पत्रकार परिषदेचे आयोजन केले होते . यावेळी  राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे अध्यक्ष संभाजी पाटील , अकोले खुर्द चे सरपंच कांतीलाल नवले , दिपक पाटील , ब्रह्मदेव मस्के , गणेश पाटील , संजय मिस्कीन चव्हाणवाडी मा.चेअरमन नरहरी नांगरे,मा.सरपंच सुनिल मिस्किन  उपस्थित होते.

          यापुढे बोलताना माजी सभापती संजय पाटील भिमानगरकर म्हणाले की , काही पुढार्यांनी सोलापूर जिल्हातील सर्व शेतकरी नामर्द आहेत , असे वक्तव्य केले त्याबद्दल संजय कोकाटे यांनी माफी मागावी.
हा सर्व शेतकर्यांचा अपमान आहे, कालची सर्व नेते शेतकऱ्यांचे मुलं आहेत त्यामुळे तो त्यांच्या बापाचा अपमान आहे .शेतकर्यांच्या जोडधंद्याला विरोध करण्याच काम संजय कोकाटे करत आहेत , परिवहन विभागाने पुर्ण क्षमतेने वाहतूक करण्यची परवानगी द्यावी. आमदार बबनराव शिंदे यांनी एफआरपी प्रमाणे दर दिला आहे.
संजय कोकाटे यांनी आ.बबनराव शिंदे यांच्या वर खालच्या भाषेत टिका केली , विक्रृत मनस्थितीतुन कोकाटे टीका करत आहेत 
नामर्द या शब्दाचा अर्थ सांगावा 
तारतम्य व कुवत ठेवून टिका करावी , अनेक पक्ष बदलणार्याने आमदार बबनराव शिंदे यांच्यावर टीका करु नये .१२ टन पेक्षा वाहतूक करणारे वर कार्यवाही करू असे सांगितले आहे पण, 
परिवहन विभागाने दंडात्मक कारवाई करु नये ही विनंती  मुख्यमंत्र्यांना निवेदनाद्वारे करणार असल्याचे माजी सभापती संजय पाटील भिमानगरकर यांनी सांगितले आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा