Breaking

बुधवार, ३० नोव्हेंबर, २०२२

तडीपार गावगुंड जगदीश गायकवाड याच्यावर गुन्हा दाखल करा - जिल्हाध्यक्ष राहूल चव्हाण



तडीपार गावगुंड जगदीश गायकवाड याच्यावर गुन्हा दाखल करा - जिल्हाध्यक्ष राहूल चव्हाण


टेंभुर्णी (प्रतिनिधी)
                     पनवेल येथील तडीपार गावगुंड जगदीश गायकवाड या विकृत समाजकंटकाने बाळासाहेब आंबेडकर व आंबेडकर परिवाराबाबत जहरी गरळ ओकली असुन राज्यातील कायदा सुव्यवस्था बिगडवुन दंगली घडवण्याच्या दृष्टिकोनातून सदरी निच कृत्य करण्यात आले आहे. तरी वंचित बहुजन आघाडीच्या वतीने सदरील जगदीश गायकवाड यांस शोधुन जेरबंद करावे तसेच याच्या सर्व गैर व्यवहाराची चौकशी करावी असे  टेंभूर्णी पोलिस स्टेशन मध्ये आज सकाळी अकरा वाजता टेंभुर्णी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सुरेश निंबाळकर यांना निवेदन देण्यात आले आहे.
                    टेंभुर्णी पोलीस ठाण्यात देण्यात आलेल्या निवेदनात पनवेल येथील तडीपार असलेला गुंड प्रवृत्तीचा व स्वतःला राजकीय पक्षाचा कार्यकर्ता म्हणून घेणारा जगदीश गायकवाड या समाजकंटकाने वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रकाश आंबेडकर आणि कुटुंबीयाबद्दल सोशल मीडियाच्या माध्यमातून अश्लील भाषेत शिवीगाळ करून आंबेडकर कुटुंबाचा ओमान केला आहे. समस्त दिन दलितांच्या तसेच वंचितांच्या मानवी कल्याणासाठी आपले आयुष्य खर्ची घालणाऱ्या महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आंबेडकर यांच्या कुटुंबीयाबद्दल अपमानास्पद शब्द वापरून शिवीगाळ करणं हे मानसिक विकृतीचेच लक्षण आहे, अशी व्यक्ती संपूर्ण समाजासाठी घातक आहे. त्याच्या ह्या कृतीमुळे संपूर्ण आंबेडकर समाजाच्या भावना दुखावल्या आहेत. त्याच्याबद्दल तीव्र रोष निर्माण झाला आहे. तरी वरील गायकवाड यास समाजकंटकास प्रशासनाने तातडीने अटक करून कठोर कारवाई करून करावी, अन्यथा वंचित बहुजन आघाडी सोलापूर जिल्ह्याच्या वतीने सोलापूर जिल्ह्यात उग्र आंदोलन करण्याचा इशारा निवेदनात दिला आहे.
                यावेळी जिल्हा अध्यक्ष राहुल चव्हाण महासचिव विशाल नवगिरे, उपाध्यक्ष रोहित खंडाळे,संघटक देविदास भोसले, शरीफ काझी, युवा आघाडी जिल्हा उपाध्यक्ष विशाल मिसाळ,ता.महासचिव प्रवीण वाघमारे, युवा आघाडी महासचिव सचिन झेंडे, ता.उपाध्यक्ष गणेश पवार, मिलिंद पालखे, गौतम कांबळे, सोमा लोंढे, सागर सरोदे, राजू वाघमारे, अविनाश लोंढे, रोहित जगताप, विशाल लोंढे, सागर लांडगे, किरण कांबळे, विशाल लोंढे, करमाळा, विक्रम खरात, प्रेम कांबळे, प्रशांत लोंढे, लखन भोसले, समाधान कांबळे आदी उपस्थित होते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा