विठ्ठलराव शिंदे साखर कारखान्यावर वाहतुक सुरक्षिततेबाबत मार्गदर्शन व रिफ्लेक्टर वाटप-
टेंभुर्णी प्रतिनिधी /धनंजय भोसले
विठ्ठलराव शिंदे सहकारी साखर कारखान्यावर 15 नोव्हेंबर रोजी कारखान्याकडे तोडणी वाहतुक करणारे वाहनमालक, ड्रायव्हर व बैलगाडीवान यांचेकरीता टेंभूर्णी पोलिस स्टेशन व कुर्डूवाडी पोलिस स्टेशन यांचे वतीने काररखाना कार्यस्थळावर वाहतुक सुरक्षा संदर्भात मार्गदर्शन व सुरक्षिततेच्या दृष्टीने वाहनांना रिफ्लेक्टर बसविण्यात आले.
विठ्ठलराव शिंदे सहकारी साखर कारखान्याचा सन 2022-23 गळीत हंगाम चालू असून कारखान्याकडे तोडणी वाहतुक करणारे वाहनमालक, ड्रायव्हर व बैलगाडीवान यांना सुरक्षिततेच्या दृष्टीने वाहतुकीच्या नियमांचे अवलोकन व्हावे यासाठी टेंभूर्णी पोलिस स्टेशन कडील पोलीस निरिक्षक सुरेश निंबाळकर व कुर्डूवाडी पोलिस स्टेशन कडील सहाय्यक पोलीस निरिक्षक विक्रांत बोधे यांनी वाहन सुरक्षितेबाबत मार्गदर्शन व ऊस वाहतुक करणारी वाहने व बैलगाडी यांना कशा पध्दतीने रिफ्लेक्टर बसवावेत याचे प्रात्यक्षिक दाखवून वाहतुकीच्या नियमांचे महत्त्व पटवून दिले व त्यानुसार सर्व संबंधित वाहन मालकांनी व बैलगाडीवान यांनी याची दक्षता घेण्याच्या सुचना त्यांनी दिल्या. तसेच कारखान्याकडे तोडणी वाहतुक करणारे वाहनमालक, ड्रायव्हर व बैलगाडीवान यांना त्यांच्या शुभहस्ते कापडी रिफ्लेक्टरचे वाटप करण्यात आले. वेळोवेळी वाहनांची आर.टी.ओ.कडून तपासणी करून घ्यावी,वाहन चालकाकडे लायसन्स असणे आवश्यक दारू पिऊन वाहने चालवू नये.. पंमचर व बिघाड झाल्यास रोड चे डाव्या बाजूने वाहन लावून मागील वाहनांना आपले वाहन दिसावे,अपघात होऊ नये यासाठी सुरक्षीत ता बाळगावी इत्यादी बाबत त्यांनी मार्गदर्शन केले. तसेच कारखान्यामार्फत तोडणी वाहतुक करणारे वाहनमालक, ड्रायव्हर व बैलगाडीवान यांना रेडियम फ्लेझेबल रिफ्लेक्टर बॅनर वाटप करून, रिफ्लेक्टर लावणे बंधनकारक करण्यात आले.
याप्रसंगी टेंभूर्णी पोलिस स्टेशन कडील पोलीस निरिक्षक सुरेश निंबाळकर व कुर्डूवाडी पोलिस स्टेशन कडील सहाय्यक पोलीस निरिक्षक विक्रांत बोधे,पोलीस कर्मचारी माळी, गुटाळ, सह ट्रॅफिक कर्मचारी व कारखान्याचे कार्यकारी संचालक एस.एन.डिग्रजे,केन मॅनेजर एस.पी.थिटे, मुख्य शेतकी अधिकारी एस.एस.बंडगर,ऊस पुरवठा अधिकारी एन.एन. गायकवाड, सुरक्षा अधिकारी एफ.एम.दुंगे, सुरक्षा रक्षक तसेच वाहनमालक, बैलगाडीवान मोठ्या संख्येने उपस्थित होते.


कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा