Breaking

मंगळवार, १५ नोव्हेंबर, २०२२

भारत महाविद्यालयाच्या प्रदीप बेरेची नॅशनल चॅम्पीयन स्पर्धेसाठी निवड



भारत महाविद्यालयाच्या प्रदीप बेरेची नॅशनल चॅम्पीयन स्पर्धेसाठी निवड



करमाळा प्रतिनिधी
       जेऊर ता.करमाळा येथील भारत महाविद्यालयाचा बी.ए.भाग 2 चा विद्यार्थी प्रदीप पांडुरंग बेरे याची कुस्तीच्या नॅशनल चॅम्पियन स्पर्धेसाठी निवड झाली आहे. के.एन्. भिसे महाविद्यालय कुर्डूवाडी येथे झालेल्या फ्री स्टाईल कुस्ती स्पर्धेत सलग पाच कुस्त्या जिंकून प्रदीप बेरे या विद्यार्थ्यांने पुण्यश्लोक आहिल्यादेवी होळकर विद्यापीठामध्ये 86 किलो वजन गटात प्रथम क्रमांक मिळवला व नॅशनल चॅम्पियन स्पर्धेसाठी तो पात्र ठरला आहे. प्रदीप बेरे या विद्यार्थ्याच्या या यशाबद्दल भारत शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष मा.आमदार नारायण आबा पाटील, उपाध्यक्ष अनिलकुमार  गादीया ,सचिव प्रा.अर्जुन सरक, भारत महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. अनंत शिंगाडे व महाविद्यालयाच्या प्राध्यापकवृंदासह सर्वांनी त्याचे अभिनंदन केले.


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा