रविंद्रदादा श्रीखंडे यांचा वाढदिवस विविध उपक्रमांनी साजरा...
बेंबळे प्रतिनिधी: मिटकलवाडी गावचे उपसरपंच रविंद्रदादा श्रीखंडे यांचा ५० वा वाढदिवस नेत्ररोग तपासणी शिबीर, विद्यार्थ्यांना वह्या व खाऊ वाटप, झाडे वाटप तसेच वाढदिवसानिमित्त घेण्यात आलेल्या क्रिडा स्पर्धेतील स्पर्धकांना बक्षिस वाटप अशा विविध उपक्रमांनी मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. नेत्ररोग तपासणी शिबीरादरम्यान ८५ गरजू रूग्णांनी लाभ घेतला.
याप्रसंगी आ. बबनराव शिंदे, आ. संजयमामा शिंदे, धनराज शिंदे यांनी रविंद्रदादा श्रीखंडे यांचे दूरध्वनीवरून अभिष्टचिंतन केले. तर जिल्हा दूध संघाचे चेअरमन रणजितसिंह शिंदे, माढा पंचायत समिती सभापती विक्रमसिंह शिंदे, माजी जिल्हा परीषद सदस्य संजय पाटील, उपसभापती धनाजी जवळगे, आप्पासाहेब पाटील, ब्रम्हदेव मस्के, दिपक पाटील, महादेव घाडगे, ग्रामसेवक नवनाथ दोंड यांनी कार्यक्रमास उपस्थित राहून श्रीखंडे यांचे अभिष्टचिंतन केले.
यावेळी उपस्थित मान्यवरांचा सन्मान सरपंच प्रतिनिधी संतोष सुरवसे, माजी सरपंच मोहन आप्पा लोकरे, माणिक आबा मिटकल, राष्ट्रवादी जिल्हा उपाध्यक्ष नवनाथ सुरवसे, सोसायटीचे चेअरमन संजय मिटकल, मा. उपसरपंच सहदेव मिस्कीन, शशिकांत लोकरे, चेअरमन शहाजी मिस्कीन, शहाजी श्रीखंडे, दत्ताभाऊ सलगर, तानाजी लोकरे, सतिश मिस्कीन, राजाभाऊ देवकर, महावीर सलगर आदींच्या हस्ते करण्यात आला.
सदर कार्यक्रमाचे आयोजन विकास श्रीखंडे व मित्र परीवाराकडून करण्यात आले. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन अजय श्रीखंडे व सौ. वंदना सचिन श्रीखंडे यांनी केले. यावेळी मिटकलवाडीकर ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.


कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा