*राष्ट्रवादीच्या आंदोलनाच्या इशाऱ्याला आले यश*
*महावितरण मंडळाने शेतकऱ्यांचा वीज पुरवठा केला आठ तास सुरळीत*
टेंभुर्णी/ प्रतिनिधी
जिल्हा दूध संघाचे चेअरमन रणजीत सिंह शिंदे यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेसने दिनांक 21 नोव्हेंबर 2022 रोजी महावितरण कंपनीच्या ऑफिस समोर आंदोलनाचा इशारा देण्यात आला होता. याच आंदोलनाची दखल घेत एम एस ई बी अधिकाऱ्यांनी दिनांक 20 नोव्हेंबर 2022 रोजी खंडित केलेला शेतकऱ्यांचा वीज पुरवठा आठ तास सुरू करण्यात येईल अशा आशयाचे पत्रक काढले व वीज पुरवठा आठ तास सुरळीत केला त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी माढा तालुक्याच्या सर्व कार्यकर्त्यांकडून व शेतकरी बांधवांकडून महावितरण कंपनीचे आभार मानले महावितरण कंपनीने अचानक बंद केलेला वीज पुरवठा पूर्वत केल्यामुळे राष्ट्रवादीच्या आंदोलनाला यश आले आहे त्यामुळे शेतकरी आनंदी झाले आहेत
यावेळी एम एस ई बी अधिकाऱ्यांनी सांगितले की बंद केलेला वीज पुरवठा शेतकऱ्यांची वीज आठ तास चालू चालू करण्याचा आदेश देण्यात आला आहे
यावेळी एम एस ई बी कडून पत्र घेताना जिल्हा परिषद सदस्य प्रतिनिधी शिवाजीराव पाटील माजी सभापती संजय पाटील भिमानगरकर माढा विधानसभा अध्यक्ष रमेश पाटील राष्ट्रवादी युवक तालुकाध्यक्ष संभाजी पाटील राष्ट्रवादीचे नेते रामभाऊ शिंदे दिलीप भोसले माढा तालुका युवक उपाध्यक्ष रामभाऊ नवले सचिन होदाडे अनेक राष्ट्रवादीचे कार्यकर्ते व एम एस ई बी चे उपकार्यकारी अभियंता यु जी जाधव इत्यादी उपस्थित होते
चौकट
महावितरण कंपनीने अचानक शेतकऱ्याची तोडलेली वीज राष्ट्रवादीच्या आंदोलनावरून वीजपुरवठा आठ तास पूर्ववत करण्यात आला आहे तरी रणजीत सिंह शिंदे यांच्या नेतृत्वाखालील आंदोलनास तूर्तास स्थगिती देण्यात यावी असे उपकार्यकारी अभियंता टेंभुर्णी विभाग यु जी जाधव यांनी केले आहे


कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा