Breaking

शनिवार, १९ नोव्हेंबर, २०२२

अतिक्रमण नियमनुकूल करण्यासाठी समिती स्थापन कराव्यात श्रावण बाळ माता पिता सेवा संघाचे राज्य समन्वयक गणेश जगताप यांची जिल्हाधिकारी कडे मागणी



अतिक्रमण नियमनुकूल करण्यासाठी समिती स्थापन कराव्यात श्रावण बाळ माता पिता सेवा संघाचे राज्य समन्वयक गणेश जगताप यांची जिल्हाधिकारी कडे मागणी 




करमाळा प्रतिनिधी 
   अतिक्रमण नियमनुकूल करण्यासाठी समित्या स्थापन कराव्यात अशी मागणी एका निवेदनाद्वारे श्रावणबाळ माता-पिता सेवा संघाचे राज्य समनव्यक गणेश जगताप यांनी जिल्हाधिकारी यांच्याकडे केली आहे
   जिल्हाधिकारी यांना पाठवलेल्या निवेदनात श्री जगताप यांनी पुढे असे म्हटले आहे की,
   अतिक्रमण नियमानुकुल करण्याबाबतचा उच्च न्यायालय औरंगाबाद खंडपीठ पीआयएल ३९/ २०१४ च्या अतिक्रमण नियमनुकूल करणे बाबतच्या ४ एप्रिल २००२ चे शासन निर्णयाच्या अंमलबजावणी करणे बाबत माननीय विभागीय आयुक्त पुणे यांनी आपणास पत्र क्रमांक ०५/१०/ २०१५ च्यानुसार कळवले आहे.मा. सर्वोच्च न्यायालयाने २८ जानेवारी २०११  व या अनुषंगाने राज्य शासनाने १२ जुलै २०११ च्या शासन निर्णयानुसार शासकीय जमिनीवर अतिक्रमण काढून टाकण्याच्या आदेश दिले असले तरी या आदेशातून यापूर्वी राहत असलेल्या कुटुंबांना वगळण्यात आलेले आहे.यापूर्वीचा अतिक्रमण नियमनुकूल करण्याबाबतच्या ४ एप्रिल २००२ च्या शासन निर्णयाच्या अंमलबजावणी करण्याचा मा.औरंगाबाद खंडपीठाचा आदेश आहे.यानुसार आम्ही आमच्या अतिक्रमण नियमनुकूल करण्यास पात्र आहोत त्यामुळे ही वस्तुस्थिती शासनाच्या लक्षात आणून द्यावी. असे निवेदनात म्हटले आहे.
     पुणे विभागीय आयुक्त यांच्या पत्रानुसार व शासनाच्या ४ एप्रिल २००२ च्या शासन निर्णयाची बाब ५ नुसार शासकीय जमिनीवर राहत असलेल्या कुटुंबांच्या जागांचे लेआउट करण्याकरिता सोलापूर जिल्ह्यामध्ये तहसीलदार यांच्या अध्यक्षतेखाली तर महानगरपालिका हद्दीतील जागांची लेआउट करणे करता महानगरपालिका आयुक्त यांच्या अध्यक्षतेखाली तातडीने समिती स्थापन करण्याच्या आदेश संबंधित यांना द्यावेत अशी ही मागणी केली आहे.
    सद्यस्थिती सोलापूर जिल्ह्यामध्ये ह्या समिती स्थापन होणे गरजेचे होते परंतु या समिती स्थापन झाल्याने अतिक्रमण नियमानुकूल झालेले नाहीत व आपल्याकडून सध्या अतिक्रमण काढून टाकण्यात यावे असे आदेश दिल्यामुळे जिल्ह्यातील नागरिकात प्रचंड भीती निर्माण झाली आहे.
    आपणास विनंती आहे की ही परिस्थिती सत्य परिस्थिती शासनाच्या निदर्शनास आणून द्यावी व अतिक्रमण काढण्याची कारवाई तत्काळ स्थगित करावी.
    तसेच विभागीय आयुक्त पुणे यांच्या आदेशानुसार सोलापूर जिल्ह्यातील सर्व तहसील कार्यालय येथे अतिक्रमण नियमनुकूल करण्याच्या समिती स्थापन करण्यास आदेश द्यावेत अशी ही मागणी श्रावणबाळ माता-पिता सेवा संघाचे राज्य समनव्यक गणेश जगताप यांनी निवेदनाच्या शेवटी केली आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा