माढा वेल्फेअर फाउंडेशनच्या वतीने अत्याधुनिक शेती प्रयोगशाळेचे गुरुवारी उद्घाटन .
कन्हेरगांव दि प्रतिनिधी ( धनंजय मोरे )
- माढा तालुक्यातील निमगाव टे येथे मुकुल माधव फौंडेशन आणि फिनोलेक्स पाईप्स यांच्या सहयोगाने आणि माढा वेल्फेअर फाउंडेशनच्या व कृषी विभाग सोलापूर यांच्या माध्यमातून अत्याधुनिक शेती प्रयोगशाळेचे उद्घाटन उद्या गुरुवार २४ नोव्हेंबर दुपारी ४ कंपनी कार्यस्थळावर होणार आहे.
सदर उद्घाटन जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर, आ. बबनदादा शिंदे, आ. संजयमामा शिंदे, फिनोलेक्स इंडस्ट्रीज चे सी ई ओ अजित वेंकटरमण यांच्या हस्ते होणार आहे. तसेच या कार्यक्रमाला पोलिस अधिक्षक शिरीष सरदेशपांडे, मुख्य कार्यकारी दिलीप स्वामी, राज्य उत्पादन शुल्क अधीक्षक नितीन धार्मिक, उप वन संरक्षक धैर्यशील पाटील, राष्ट्रीय डाळिंब संशोधन केंद्राचे संचालक डॉ. राजीव मराठे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी बाळासाहेब शिंदे आदींसह उपस्थित राहणार आहेत.


कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा