“ आत्महत्येस प्रवृत्त करणाऱ्यावर गुन्हा दाखल.”
प्रतिनिधी रुपेश डोलारे उस्मानाबाद
तुळजापूर पोलीस ठाणे : भातंब्री, ता. तुळजापूर येथील- धरती तानाजी कांबळे, वय 17 वर्षे हिने दि. 20.11.2022 रोजी 17.30 वा. पुर्वी आपल्या राहत्या घरात आत्महत्या केली. या प्रकरणाच्या चौकशीवरुन तुळजापूर पो.ठा. चे सपोनि- श्री. ज्ञानेश्वर कांबळे यांनी सरकारतर्फे दिलेल्या प्रथम खबर दिली की, धरतीचे पिता- तानाजी कांबळे हे कौटुंबीक कारणावरुन मागील काही दिवसांपासून धरती हिस टॉर्चर करत होते. त्यांच्या या टॉर्चरला कंटाळून धरती हिने आत्महत्या केली आहे. यावरुन तुळजापूर पो.ठा. येथे भा.दं.सं. कलम- 306 अंतर्गत गुन्हा दि. 20.11.2022 रोजी नोंदवला आहे.


कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा