Breaking

बुधवार, ३० नोव्हेंबर, २०२२

लोकसेवकाच्या कर्तव्यात अडथळा करणाऱ्या चौघा आरोपींस कारावासासह दंड.”


*लोकसेवकाच्या कर्तव्यात अडथळा करणाऱ्या चौघा आरोपींस कारावासासह दंड.”


 प्रतिनिधी रुपेश डोलारे धाराशिव 


तामलवाडी पोलीस ठाणे : कर्तव्य बजावणाऱ्या लोकसेवकास त्या कर्तव्यापासून परावृत्त करण्यासाठी त्यास अडवून मारहान केल्याप्रकरणी तामलवाडी पो.ठा. येथील  गुन्हा क्र. 66/2015 चा तपास तत्कालीन सहायक पोलीस उपनिरीक्षक- श्री. एस.एल. शिंदे यांनी करुन न्यायालयात दोषारोपपत्र सादर केले होते. या सत्र खटला 69/2019 ची सुनावणी उस्मानाबाद येथील जिल्हा व तदर्थ सत्र न्यायालय क्र. 1 येथे होउन आज दि. 29.11.2022 रोजी निकाल जाहिर झाला. यात न्यायाधीश मा. श्री. कर्वे यांनी तामलवाडी ग्रामस्थ- सिध्देश्वर भाले, सिराज शेख, जाकीर शेख, इरफान जहागीरदार या सर्वांना भा.दं.सं. कलम- 332 च्या उल्लंघनाबद्दल प्रत्येकी 6 महिने कारावासासह प्रत्येकी 2,000 ₹ दंड,  भा.दं.सं. कलम- 341 च्या उल्लंघनाबद्दल प्रत्येकी 1 महिना कारावासासह 500 ₹ दंड, भा.दं.सं. कलम- 353 च्या उल्लंघनाबद्दल प्रत्येकी 1 वर्षे कारावासासह 3,000 ₹ दंड अशा शिक्षा सुनावल्या आहेत.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा