*पंढरपूर - करूल जोडणाऱ्या रस्त्यासाठी 20 कोटी रुपये मंजूर.......आ.बबनदादा शिंदे
पंढरपूर ते सोलापूर मार्गावरील पंढरपूर- देगाव -चिंचोली -टाकळी सिकंदर - कुरुल ते रा.मा. क्रमांक 202 ला जोडणारा रस्ता प्रजिमा 66 कि.मी. 0/0 ते 35/ 700 या महत्त्वाच्या रस्त्यासाठी विशेष रस्ते दुरूस्ती अंतर्गत वीस कोटी रुपये मंजूर झाले असल्याची माहिती आमदार बबनदादा शिंदे यांनी दिली.
या रस्त्याबाबत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन निधीची मागणी केल्यानंतर उपमुख्यमंत्री महोदयांनी तातडीने सार्वजनिक बांधकाम मंत्र्यांना वीस कोटी रुपये देण्याविषयी कळवले व त्याप्रमाणे सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांनी अधिकाऱ्यांना तसे आदेश दिले. लवकरच या रस्त्याचे टेंडर निघणार असून काम सुरू होणार असल्याचे आमदार बबनदादा शिंदे यांनी यावेळी सांगितले.
वस्तुस्थिती अशी आहे की पंढरपूर- सोलापूर मार्गावरील पंढरपूर- देगाव -चिंचोली- टाकळी सिकंदर- कुरुल या 35 किलोमीटर रस्त्यासाठी आमदार बबनदादा शिंदे यांनी म.वी.आ. शासनाकडे 40 कोटी रुपयांची मागणी केली होती, हा प्रश्न अधिवेशनात देखील उपस्थित केला होता, तसेच मंत्रालयात मिटींग लावून तत्कालीन सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांच्याशी चर्चा होऊन मंत्री महोदयांनी निधी मंजूर करण्याविषयी सकारात्मकता दर्शवली होती त्यानंतर सरकार बदलले .
पंढरपूर देगाव चिंचोली टाकळी सिकंदर कुरुल ते रामा 202 ला जोडणारा रस्ता प्रजिमा 66 किलोमीटर 0/0 ते 35 /700 हा 20 कि.मी.अत्यंत खराब रस्ता असून यावर मोठमोठे खड्डे पडले आहेत. या रस्त्यावरून पंढरपूर व सोलापूर कडे शेती मालाची वाहतूक केली जाते . या भागातील शिक्षण संस्था तीर्थक्षेत्रे बाजारपेठा दवाखाने व साखर कारखाने या रस्त्यामुळे जोडले गेले आहेत त्यामुळे यावरून अहोरात्र वाहतूक चालू असते. हा संपूर्ण परिसर बागायती क्षेत्र असल्यामुळे यावरून उसाची वाहतूक तसेच फळे भाजीपाला इ.ची सोलापूर व पंढरपूर कडे वाहतूक चालूच असते, ही वस्तुस्थिती उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निदर्शनास आणून दिल्यानंतर व चर्चा केल्यानंतर त्यांनी तात्काळ वीस कोटी रुपये मंजूर केले व त्याप्रमाणे सार्वजनिक बांधकाम मंत्री नामदार रवींद्र चव्हाण यांनी 20 कोटी रुपये देण्याचे अधिकाऱ्यांना आदेश दिले असे आमदार बबनदादांनी यावेळी सांगितले. अनेक दिवसापासून ची रस्त्याची समस्या मिटणार असल्यामुळे नागरिकामध्ये समाधान व्यक्त होत आहे.


कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा