Breaking

मंगळवार, ११ ऑक्टोबर, २०२२

आवाटी येथील वली बाबा दर्गाह मध्ये पैगंबर जयंतीनिमित्त उद्या विविध धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन



आवाटी येथील वली बाबा दर्गाह मध्ये पैगंबर जयंतीनिमित्त उद्या विविध धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन


करमाळा प्रतिनिधी

 जगाला शांततेचा संदेश देणारे तसेच इस्लाम धर्माचे संस्थापक हजरत मोहम्मद पैगंबर यांच्या जयंतीनिमित्त आवाटी तालुका करमाळा येथे वली बाबा दर्गा मध्ये उद्या दिनांक 12 ऑक्टोंबर 2022 रोजी विविध  धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन केले असल्याची माहिती वलीबाबा दर्गा ट्रस्टचे अध्यक्ष हाजी कादरभाई तांबोळी यांनी बोलताना दिली

ईद-ए-मिलादुन्नबी अर्थात पैगंबर जयंतीनिमित्त प्रतिवर्षाप्रमाणे याही वर्षी आवाटी येथे विविध धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन दर्गा ट्रस्टच्या वतीने करण्यात येत असते याही वर्षी विविध धार्मिक कार्यक्रमा चे आयोजन केले आहे पैगंबर जयंतीनिमित्त दर्गाहच्या पटांगणात विद्युत रोषणाई करण्यात आली असून आलेल्या भक्त गणाची पार्किंगची व्यवस्था ही केली आहे

बुधवार दिनांक 12 ऑक्टोंबर 2022 बुधवार उर्दू तारीख 15 रब्बी उल अव्वल रोजी हजरत मोहम्मद पैगंबर यांच्या जीयारते मुए मुबारक चा कार्यक्रम सकाळी आठ वाजल्यापासून संध्याकाळी नऊ वाजल्या पर्यंत आयोजित केला आहे त्यानंतर इशा च्या नमाज नंतर धार्मिक प्रवचन तसेच महफीले समाचा कार्यक्रम आहे याशिवाय आलेल्या भक्तगणांना महाप्रसादाचे लंगर खाना आयोजन दर्गा ट्रस्टच्या वतीने करण्यात आले आहे
सदर धार्मिक कार्यक्रमाचा लाभ भक्तगणांनी घ्यावा असे आवाहन वली बाबा यांचे खादीम गुलाम नबी कादरी, हसनैन कादरी, व इरफान कादरी यांनी केले आहे

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा