Breaking

सोमवार, १७ ऑक्टोबर, २०२२

टेंभुर्णी येथील दूध संघाच्या जागेतील नियोजित 70 गाळ्यांच्या बुकिंगला उस्फुर्त प्रतिसाद- चेअरमन रणजितसिंह शिंदे


टेंभुर्णी येथील दूध संघाच्या जागेतील नियोजित 70 गाळ्यांच्या बुकिंगला उस्फुर्त प्रतिसाद- चेअरमन रणजितसिंह शिंदे


अवघ्या दोन दिवसातच 30 गाळ्यांचे झाले बुकिंग ; इच्छुकांनी त्वरित संपर्क करण्याचे आवाहन


माढा / प्रतिनिधी (राजेंद्र गुंड पाटील)- अडचणीत व तोट्यात गेलेल्या जिल्हा दूध उत्पादक व प्रकिया संघाच्या चेअरमनपदी बिनविरोध निवड झाल्यानंतर रणजितसिंह शिंदे यांनी दूध संघाला गतवैभव प्राप्त करून देण्यासाठी आणि अडचणीतून बाहेर काढण्यासाठी चांगलीच कंबर कसली आहे.अनेक धोरणात्मक निर्णय घेतल्याने कमी कालावधीत दूध संकलनात मोठी वाढ झाली आहे त्यामुळे संघाची योग्य दिशेने प्रगतीकडे वाटचाल सुरू झाली आहे त्याचाच एक भाग म्हणून माढा तालुक्यातील टेंभुर्णी येथील जिल्हा दूध संघाच्या जागेत विविध व्यवसायिकांसाठी 70 नवीन गाळे बांधण्याचा निर्णय घेतला असून त्यास व्यावसायिकांमधून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाल्याचे चेअरमन रणजितसिंह शिंदे यांनी सांगितले आहे.

कुर्डूवाडी ते टेंभुर्णी या मुख्य रोड शेजारील टेंभुर्णी एमआयडीसी हद्दीत असलेल्या जागेमध्ये विविध व्यवसायासाठी 70 नवीन गाळे बांधण्याचा धोरणात्मक निर्णय संचालक मंडळांने घेतला आहे.सध्या या गाळ्यांचे बुकिंग सुरू झाल्या असून अवघ्या दोन दिवसातच 30 गाड्यांचे बुकिंग झाले आहे त्यामुळे गाळे बुकिंगला लोकांचा प्रचंड उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे.माढा तालुक्यातील ज्या इच्छुक व्यवसायिकांना या ठिकाणी नवीन गाळे हवे आहेत त्यांनी आवश्यक त्या कागदपत्रांची व अटींची पूर्तता करून त्वरित गाळ्याचे बुकिंग करून घ्यावे असे आवाहन चेअरमन रणजितसिंह शिंदे यांनी केले.




कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा