Breaking

गुरुवार, ६ ऑक्टोबर, २०२२

बेंबळे गीता पाठशाळेचा 27 वा वर्धापन दिन संपन्न.



बेंबळे गीता पाठशाळेचा 27 वा वर्धापन दिन संपन्न.


 बेंबळे। प्रतिनिधी।                


              बेंबळे गीतापाठशाळेचा 27 वा वर्धापन दिन उत्साहात संपन्न करण्यात आला. प्रजापिता ब्रह्माकुमारी ईश्वरीय विश्वविद्यालय माउंट आबू येथील अध्यात्मिक विद्यालयाच्या गीता पाठशाळेचा बेंबळे येथे 27 वर्षांपूर्वी प्रारंभ करण्यात आला. सुरुवातीला काही अडचणींना सामोरे जाऊन मुरली वाचन, योग, क्लास असे कार्यक्रम येथील देशमुख वाड्यात घेण्यात येत होते. 

त्यानंतर येथील सेवानिवृत्त मेजर निवृत्ती कदम व त्यांच्या सुविध्य पत्नी संजीवनी कदम यांनी आपल्या " दिव्य ज्योती" बंगल्यात गीता पाठशाळा सुरु ठेवलेली आहे.  या गीता पाठ शाळेत दररोज योग ,मुरली वाचन, क्लास असे अध्यात्मिक कार्यक्रम घेतले जातात तसेच महाशिवरात्र, गोकुळाष्टमी, रक्षाबंधन ,भाऊबीज व इतरही सर्व धार्मिक सणांचे कार्यक्रम उत्साहाने संपन्न केले जातात,  ज्ञान ,योग, मुरली ,धारणा, पवित्रता आणि सेवा या तत्वाचे तंतोतंत पालन केले जाते, गीता पाठशाळेची जबाबदारी ब्रह्माकुमारी वैजयंती कुलकर्णी या सांभाळतात व त्यांना सर्व बंधू-भगिनी सहकार्य करतात. मागील 27 वर्षापासून येथील प्रतिष्ठित घराण्यातील अनेक स्त्री-पुरुष अध्यात्मिक ज्ञानाचा लाभ घेत आहेत, टेंभुर्णी उपसेवा केंद्राच्या संचालिका अनिता बेहेनजी या मुख्य मार्गदर्शिका आहेत. माउंट आबू राजस्थान येथे ब्रह्माकुमारी विश्व विद्यालयाचे मुख्यालय असून या ठिकाणी शिव परमात्म्याच्या अवतरण सोहळ्यास प्रत्येक वर्षी बेंबळे गीता पाठशाळेचे अनेक सदस्य आवर्जून उपस्थित असतात. वर्धापन दिनानिमित्त सर्वांनी  योग आणि मुरली श्रवण व शिव ध्वजारोहण करून एकमेकांना शुभेच्छा दिल्या व मिठाई प्रसादाचे सर्वांना वाटप करण्यात आले, याप्रसंगी सर्वत्र आकर्षक सजावट करण्यात आली होती .

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा