महर्षि राष्ट्रीय वक्तृत्व स्पर्धेत
जानकर, गायकवाड, जाधव, टेकाडे, पाटील, भोसले प्रथम
अकलूज / प्रतिनिधी
महर्षि राष्ट्रीय वक्तृत्व स्पर्धेत शालेय गट १ मध्ये स्नेहल जानकर (सांगोला), सायली जाधव (निमगाव), राजनंदिनी गायकवाड (अकलूज), शालेय गट २ मध्ये पृथ्वीराज जाधव (भाळवणी), आदित्य टेकाडे (बीड) यांनी तर खुल्या गटात संकेत पाटील (पुणे) व उदयनराजे भोसले (मंगळवेढा) यांनी विभागून प्रथम क्रमांक पटकाविला.
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ, सोलापूर संलग्नित शिक्षण प्रसारक मंडळ, अकलूज संचलित शंकरराव मोहिते महाविद्यालयात दरवर्षी राष्ट्रीय वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन करण्यात येते. यावर्षी या स्पर्धेचे ७ वे वर्ष होते. या स्पर्धेचे उद्घाटन सिनेअभिनेते अजय तपकिरे यांच्या हस्ते करण्यात आले. या स्पर्धेत शालेय व खुला अशा २ गटात २१० स्पर्धकांनी सहभाग घेतला होता. या स्पर्धेचा निकाल पुढीलप्रमाणे.
शालेय गट क्रमांक १ इयत्ता 1 ली ते 7 वी मराठी माध्यम मध्ये प्रथम क्रमांक स्नेहल जानकर सांगोला, सायली जाधव निमगाव, व्दितीय क्रमांक : मल्तशा तांबोळी शंकरनगर, वसुंधरा गुरव उस्मानाबाद, तृतीय क्रमांक : शिवेंद्रराजे भोसले मंगळवेढा, श्रृती भोसले शंकरनगर व साई भोसले बेंबळे , स्वराला मोरे अकलूज यांनी उत्तेजनार्थ क्रमांक पटकाविला. इंग्रजी माध्यम मध्ये प्रथम क्रमांक : राजनंदिनी गायकवाड, अकलूज व द्वितीय क्रमांक राजइंदिरा मोहिते पाटील, अकलूज यांनी पटकाविला. शालेय गट क्रमांक २ इयत्ता 8 वी ते 10 मध्ये प्रथम क्रमांक : पृथ्वीराज जाधव भाळवणी, अदित्य टेकाडे बीड, व्दितीय क्रमांक : श्रावीका जाधव बार्शी, स्नेहल वाळेकर अकलूज, तृतीय क्रमांक : रूतूजा पाटील वाटेगाव, गौरी कौलगे पिराची कुरोली तर उन्नती नलावडे वडूज हिने उत्तेजनार्थ क्रमांक मिळविला. गट क्रमांक 3 खुला गटामध्ये प्रथम क्रमांक : संकेत पाटील पुणे, उदयनराजे भोसले मंगळवेढा, व्दितीय क्रमांक : प्रसाद लोखंडे वडगाव, तेजस पाटील पुणे, तृतीय क्रमांक : शुभदा बनवले आळंदी, विश्वतेज जाधव भाळवणी तर रोहन चव्हाण बीड, सागर मइपेली सोलापूर यांनी उत्तेजनार्थ क्रमांक पटकाविला. शालेय स्पर्धकांना अनुक्रमे 2500, 2000, 1500 तर खुल्या गटातील स्पर्धकांना अनुक्रमे 5000, 4000 व 3000 अशी पारितोषिके, सन्मानचिन्हे व प्रमाणपत्र देण्यात आली.
ही स्पर्धा यशस्वी करणेसाठी शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष संग्रामसिंह मोहिते-पाटील यांचे मार्गदर्शनाखाली प्र.प्राचार्य डॉ.दत्तात्रय बागडे, IQAC समन्वयक डॉ.हनुमंत आवताडे, स्पर्धा प्रमुख डॉ विश्वनाथ आवड, समन्वयक डॉ अपर्णा कुचेकर, डॉ चंकेश्वर लोंढे, दत्तात्रय मगर, डॉ आण्णासाहेब नलावडे, डॉ सज्जन पवार, प्रा स्मिता पाटील, प्रा अनिल पराडे, प्रा विनायक माने, युवराज मालुसरे याचेंसह सांस्कृतिक विभागातील विद्यार्थ्यांनी प्रयत्न केले. या स्पर्धेकरिता डॉ जनार्दन परकाळे, प्रा अक्षय लावंड, प्रा रविंद्र नागटिळक, डॉ विशाल साळुंखे, प्रा रोहित देशमुख, प्रा नानासाहेब गव्हाणे, प्रा समाधान काळे यांनी परिक्षक म्हणून काम पाहिले.


कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा