Breaking

मंगळवार, २ ऑगस्ट, २०२२

शिवरत्न सेमी इंग्लिश स्कूलमध्ये* *नागपंचमी सण उत्साहात साजरा*


*शिवरत्न सेमी इंग्लिश स्कूलमध्ये* *नागपंचमी सण उत्साहात साजरा*


*दिनांक: १ऑगस्ट २०२२ रोजी शिवरत्न सेमी इंग्लिश स्कूलमध्ये नागपंचमी सणानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. त्याचप्रमाणे लोकमान्य टिळक पुण्यतिथी आणि लोकशाहीर अण्णाभाऊ साठे जयंती साजरी करण्यात आली. 


सर्वप्रथम लोकमान्य टिळक व लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या प्रतिमीचे पूजन मुख्याध्यापक मा श्री जितेंद्र माने देशमुख व सर्व शिक्षक यांचे हस्ते करण्यात आले व त्यावेळी प्रशालेतील शिक्षक श्री रणजित माने देशमुख यांनी लोकमान्य टिळक व अण्णाभाऊ साठे यांच्या जीवनावर प्रकाश टाकत त्यांच्या कार्याची व देशसेवेची माहिती सर्व मुलांना करून दिली त्यानंतर नागपंचमी सणानिमित्त पतंग उडवणे,मुलींच्या मेहंदी स्पर्धा, स्लो सायकल स्पर्धा आयोजित करण्यात आल्या होत्या. या कार्यक्रमाचा मुला मुलींनी भरभरून आनंद घेतला आणि प्रत्येक खेळात सक्रिय सहभाग नोंदवला त्यामुळे शाळेच्या मैदानाला उत्सवाचे स्वरूप प्राप्त झाले होते. त्याचप्रमाणे महिला शिक्षकांनी फेर धरून मंगळागौरीच्या गाण्याचा आनंद घेतला.पतंगावरील एक संदेश बेटी बचाओ बेटी पढाओ सर्वांचे लक्ष वेधून घेत होता सर्वच शिक्षकांच्या समावेशाने मुलांचा आनंद द्विगुणित झाला त्यामुळे विद्यार्थी व शिक्षक यांचे नाते घट्ट होण्यास मदत होईल हाच हेतू डोळ्यासमोर ठेवून आपण शाळेमध्ये अशा विविध सांस्कृतिक उपक्रमाचे आयोजन करीत असतो त्याचा फायदा मुलांमधील व शिक्षकांमधील दरी दूर होण्यास मदत होते.*


           *या सर्व कार्यक्रमाचे उत्कृष्ट नियोजन सांस्कृतिक विभाग प्रमुख सौ मंदाकिनी गुंड मॅडम यांनी केले तसेच या कार्यक्रमासाठी मुख्याध्यापक मा श्री जितेंद्र माने देशमुख सर व सर्व शिक्षक स्टाफ उपस्थित होता सर्वांच्या सहकार्याने कार्यक्रम व्यवस्थित पार पडला

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा