टेंभुर्णी प्राथमिक आरोग्य केंद्रात शवविच्छेदनासाठी 16 ते 18 तास मृतदेह ताटकळ ठेवला ....
दुःखी नातेवाईकामधून संताप.
......वरिष्ठ मार्फत चौकशी व्हावी.....
बेंबळे।प्रतीनीधी
प्राथमिक आरोग्य केंद्रात शवविच्छेदन करण्यासाठी डॉक्टर उपलब्ध नसल्यामुळे नातेवाईकांना १६ ते १८ तास वाट पहावी लागली. याबद्दल आरोग्य खात्याविषयी तीव्र नाराजी व्यक्त होत असून रात्रीच्या वेळेस शवविच्छेदनासाठी आरोग्य अधिकारी उपलब्ध व्हावा व मयताच्या नातेवाईकांना दुःखी वातावरणामध्ये कोणताही मानसिक त्रास होऊ नये अशी जनतेतून रास्त अपेक्षा व्यक्त होत आहे.
याबाबत वृत्तांत असा की बेंबळे तालुका माढा येथील समाधान चंद्रकांत कोळी या 28 वर्षाच्या युवकाचे भीमा नदीवरील बंधाऱ्यावरून पडून मंगळवार दिनांक 2 ऑगस्ट रोजी सायंकाळी पाच वाजता निधन झाले होते.टेंभुर्णी पोलीस स्टेशन नी पंचनामा करून मयत समाधानची डेड बॉडी शवविच्छेदनासाठी टेंभुर्णी येथील प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये सायंकाळी पाठवली होती. या ठिकाणी कोणतेही डॉक्टर उपलब्ध नसल्यामुळे हे शवविच्छेदन सकाळी होईल असं तेथील कर्मचाऱ्यांनी सांगितले. वास्तविक टेंभुर्णी प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये एक महिला आरोग्य अधिकारी रुजू झाल्या आहेत परंतु त्यांनी सांगितले की मला अधिकार नाहीत., सकाळी सहा वाजेपर्यंत सगळं होईल व मृतदेह ताब्यात मिळेल म्हणून त्याचे नातेवाईक व इतर सर्वजण रात्रभर दवाखान्यातच बसून होते ., परंतु सकाळचे दहा वाजले तरी शवविच्छेदनासाठी कोणतेही डॉक्टर अथवा कोणीही तिथे उपलब्ध झाले नसल्यामुळे मयत समाधान कोळी याचे पार्थिव आहे या अवस्थेत तिथेच पडून राहिले . बुधवारी सकाळी त्या ठिकाणी उपस्थित असलेल्या महिला डॉक्टरनी, मला शवविच्छेदनाचे अधिकार नाहीत मी नवीन आहे असे सांगून व इतर ठिकाणी कोणालाही काहीही न कळल्यामुळे या शवविच्छेदनास विलंब लागला अशी वस्तुस्थिती दिसून येते व मयताच्या नातेवाईकाचेही असेच म्हणणे येत आहे . अशा प्रसंगी दुःखी नातेवाईकांचा विचार कोणीही करत नसल्याचे दिसून येत आहे, याबाबत जनतेतून तीव्र नापसंती व्यक्त होत असून टेंभुर्णी प्राथमिक आरोग्य केंद्रात रात्रीच्या वेळेस एका डॉक्टरची नेमणूक व्हावी अशी नागरिकांची रास्त मागणी होत आहे. लवकरच या ठिकाणी जिल्हा आरोग्य उपकेंद्र होणार असल्याचे समजते पण आता जर अशी दुर्लक्षित आणि बेजबाबदार परिस्थिती आहे तर पुढे काय होणार.....। असा सवाल संतप्त नागरिक विचारत आहेत.


कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा